रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2025 13:29 IST2025-05-16T13:29:00+5:302025-05-16T13:29:21+5:30
रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात मंदोदरीची भूमिका साकारणार, याविषयी उलगडा झाला आहे. कोण आहे ही अभिनेत्री?

रणबीर कपूरच्या रामायण सिनेमात 'या' साउथ क्वीनची एन्ट्री, साकारणार मंदोदरीची भूमिका
नितेश तिवारी दिग्दर्शित आणि बहुप्रतिक्षित ‘रामायण’ (ramayan) चित्रपटाच्या स्टारकास्टमध्ये दररोज नवनवीन कलाकार सहभागी होत आहेत. ‘रामायण’ सिनेमाच्या स्टारकास्टमध्ये अजून एक मोठं नाव जोडण्यात आलं आहे. या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये काम केलं आहेत. याशिवाय या अभिनेत्रीचा साउथमध्येही चांगलाच दबदबा आहे. ही अभिनेत्री ‘रामायण’ चित्रपटात मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. कोण आहे ही अभिनेत्री?
ही अभिनेत्री दिसणार ‘रामायण’मध्ये मंदोदरीच्या भूमिकेत
लोकप्रिय साउथ अभिनेत्री काजल अग्रवाल ‘रामायण’ चित्रपटात रावणाची पत्नी मंदोदरीची भूमिका साकारणार आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, काजलने नुकतीच मंदोदरीच्या भूमिकेसाठी लूक टेस्ट पूर्ण केली आहे. लंकेचे काही महत्त्वाचे प्रसंग या चित्रपटात चित्रित करण्यात येत असून, या भूमिकेसाठी काजलचा लूक भव्य आणि राजेशाही ठेवण्यात आला आहे.
काजल अग्रवाल ही साउथमधील लोकप्रिय अभिनेत्री असून, तिने 'मगधीरा', 'थुप्पक्की', 'सिंघम' सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केले आहे. अलीकडेच ती सलमान खानसोबत 'सिकंदर' सिनेमात दिसली.
‘रामायण’ चित्रपटाविषयी
‘रामायण’ चित्रपटाचे चित्रीकरण सध्या वेगाने सुरू आहे आणि त्यासाठी प्रचंड प्रमाणावर VFX आणि भव्य सेट्सचा वापर केला जात आहे. हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार असून, पहिला भाग दिवाळी २०२६ मध्ये आणि दुसरा भाग दिवाळी २०२७ मध्ये रिलीज होईल, अशी शक्यता वर्तवली जात आहे. या सिनेमात प्रभू श्रीरामांच्या भूमिकेत रणबीर कपूर, सीतेच्या भूमिकेत साई पल्लवी तर रावणाच्या भूमिकेत केजीएफ स्टार यश दिसणार आहे. याशिवाय हनुमानाच्या भूमिकेत सनी देओल झळकणार आहे.