Confirmed! काजल अग्रवाल याच महिन्यात होणार नवरी, लग्नाची तारीख केली जाहीर
By गीतांजली | Updated: October 6, 2020 15:46 IST2020-10-06T15:40:03+5:302020-10-06T15:46:35+5:30
साऊथमधील टॉपची अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे.

Confirmed! काजल अग्रवाल याच महिन्यात होणार नवरी, लग्नाची तारीख केली जाहीर
साऊथमधील टॉपची अभिनेत्री काजल अग्रवाल लग्नाच्या बेडीत अडकणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून काजलच्या लग्नाच्या चर्चा होत्या. मात्र आता स्वत; अभिनेत्रीने या गोष्टीला दुजोरा दिला आहे. काजलने सोशल मीडियावर त्याच्या लग्नाची तारीख सांगितली आहे.
काजलने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिले, ''मला हे सांगताना अतिशय आनंद होतो की मी गौतम किचलूसोबत 30 ऑक्टोबरला लग्न करते आहे. जवळच्या कुटुंबीयांच्या उपस्थिती मुंबईत हा लग्न सोहळा पार पडणार आहे. आम्ही एकत्र आपले जीवन सुरू करण्यासाठी खूप उत्साही आहोत आणि हे देखील माहित आहे की आपण सर्वजण आमच्या आनंदात सहभागी आहात. माझ्या नव्या आयुष्याच्या सुरुवातीसाठी तुमचे आर्शीवाद हवे आहेत. नवीन मार्गाने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी मी आतापर्यत करत असलेल्या गोष्टी मी करत राहीन. तुम्ही दिलेल्या समर्थनासाठी धन्यवाद.''
काजल अग्रवालचा होणार पती गौतम किचलू एक बिझनेसमन आणि त्याला इंटीरियर डिझाइनर कलेची आवड आहे. दोघांचा साखरपुडा झाला आहे. काजल अग्रवालने 2004 मध्ये आलेल्या ऐश्वर्या राय आणि विवेक ओबेरॉयच्या ‘क्यों, हो गया ना’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. यात काजलने ऐश्वर्याच्या मैत्रिणीची भूमिका साकारली होती.त्यानंतर तिने कल्याण रामसोबत 2007 मध्ये ‘लक्ष्मी कल्याणम’ या तेलगु सिनेमातून साऊथमध्ये डेब्यू केला होता. मात्र काजलला खरी ओळख मिळाली ती एस.एस. राजमौली यांच्या ‘मगधीरा’ सिनेमातून. साऊथमध्ये काजलला जबरदस्त फॅन फॉलोईंग आहे.