अन् त्याने स्टेजवर अचानक घेतले काजल अग्रवालचे चुंबन! पाहा व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2018 15:54 IST2018-11-14T15:50:43+5:302018-11-14T15:54:57+5:30

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवाल हिला अलीकडे एका अवघडलेल्या स्थितीला सामना करावा लागला.  होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये सिनेमेटोग्राफरने काजलला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला गेला .

Kajal Aggarwal forcibly kissed by Chota K Naidu at Kavacham teaser launch | अन् त्याने स्टेजवर अचानक घेतले काजल अग्रवालचे चुंबन! पाहा व्हिडिओ!!

अन् त्याने स्टेजवर अचानक घेतले काजल अग्रवालचे चुंबन! पाहा व्हिडिओ!!

ठळक मुद्देस्टेजवर झालेला हा प्रकार पाहून सगळेच अवाक् झालेत. स्वत: काजलही या प्रकारामुळे काही क्षण भांबावली. पण नंतर तिने काही झालेच नाही, अशा पद्धतीने स्थिती सांभाळली.

‘सिंघम’ फेम अभिनेत्री काजल अग्रवाल हिला अलीकडे एका अवघडलेल्या स्थितीला सामना करावा लागला.  होय, अलीकडे एका इव्हेंटमध्ये सिनेमेटोग्राफरने काजलला बळजबरीने किस करण्याचा प्रयत्न केला गेला . स्टेजवर झालेला हा प्रकार पाहून सगळेच अवाक् झालेत. स्वत: काजलही या प्रकारामुळे काही क्षण भांबावली. पण नंतर तिने काही झालेच नाही, अशा पद्धतीने स्थिती सांभाळली.


काजलचा ‘कवच’ हा दाक्षिणात्य सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. या  चित्रपटाचा टीझर लाँच कार्यक्रम नुकताच पार पडला.  या टीझर लाँच कार्यक्रमाला काजलसोबतच दिग्दर्शक श्रीनिवास मामिल्ला, अभिनेता बेल्लमकोंडा श्रीनिवास आणि मेहरीन पीरझादा उपस्थित होते. स्टेजवर कार्यक्रम ऐन रंगात आला असताना काजल बोलण्यासाठी उभी राहिली. 
या कार्यक्रमात काजल बोलण्यासाठी उभी राहिली. दिग्दर्शक आणि इतर सहकलाकारांचे तिने आभार मानले. याचवेळी सिनेमॅटोग्राफर छोटा नायडू यांनाही तिने धन्यवाद दिलेत. पण यादरम्यान नायडू अचानक समोर आलेत आणि त्यांनी  तिला किस करण्याचा प्रयत्न केला.त्यांनी तिच्या मानेवर किस केले. या प्रकाराने काजल क्षणभरासाठी दचकली. तुम्ही तर चान्स मारलात, असे म्हणत तिने हा सगळा प्रकार गमतीने घेतला.  यावर ‘आधी तू (काजल) मेहरीनला किस केलेस. मी तुला किस करू शकत नाही असे मला थमन म्हणाला. मी का नाही करू शकत? म्हणून मी तुला किस केले, असे नायडू म्हणाले. त्यांच्या या प्रतिक्रियेनंतर काजलने हसण्यावारी घेतले. सध्या स्टेजवरचा या ‘जबरदस्तीच्या चुंबना’चा व्हिडिओ वेगाने व्हायरल होतो आहे.
 

Web Title: Kajal Aggarwal forcibly kissed by Chota K Naidu at Kavacham teaser launch