लग्नानंतर पती गौतम किचलूसोबत हनीमूनसाठी निघाली काजल अग्रवाल, फोटो व्हायरल
By गीतांजली | Updated: November 7, 2020 15:16 IST2020-11-07T14:42:32+5:302020-11-07T15:16:46+5:30
काजल व गौतम अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते

लग्नानंतर पती गौतम किचलूसोबत हनीमूनसाठी निघाली काजल अग्रवाल, फोटो व्हायरल
अभिनेत्री काजल अग्रवाल गौतम किचलूबरोबर लग्न बंधनात 30 ऑक्टोबरला अडकली आहे. लग्नानंतर पहिला करवाचौथचे सेलिब्रेशन केल्यानंतर आता हे कपल हनीमूनला निघाली आहे. काजल अग्रवालने तिच्या इन्स्टास्टोरीवर काही फोटो शेअर केले आहेत.. काजल अग्रवालने आपल्या इन्स्टाग्राम स्टोरीवर स्वतःचा आणि गौतम किचलूच्या पासपोर्टचे फोटो शेअर केले आहे. सोबत विमानाचे इमोजी देखील शेअर केले आहे. काजलेृने हनीमूनसाठी कुठे जातेय हे मात्र सांगितलले नाही.
काजल व गौतम अनेक वर्षांपासून एकमेकांना डेट करत होते. पण या रिलेशनशिपबद्दल कोणालाही काहीही ठाऊक नव्हते. त्यांनी आपले नाते जगापासून शेवटपर्यंत लपवून ठेवले.
मात्र गौतम व काजलच्या लग्नाची जोरदार चर्चा झाली.कुटुंब आणि मित्रपरिवाराच्या उपस्थितीत त्यांचा विवाहसोहळा पार पडला. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अगदी मोजके पाहुणे या लग्नाला हजर होते. काजल आणि गौतमच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. काजलचा नवरा गौतम किचलूचा इंटीरिअरचा व्यवसाय आहे.
काजल अग्रवालने अनेक दाक्षिणात्य सिनेमांमध्ये मुख्य अभिनेत्रीच्या भूमिका साकारल्या आहेत. हिंदी सिनेमातही तिने काम केले आहे.अजय देवगणसोबत सिंघम या चित्रपटामध्येही ती दिसली होती. त्यानंतर अक्षय कुमारसोबत स्पेशल 26 सिनेमातही तिने काम केले.