काबील टायटल साँग : हृतिक म्हणतोय यामीला - मैं काबील हूं या नहीं
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2016 11:38 IST2016-12-08T11:31:35+5:302016-12-08T11:38:23+5:30
रोमॅण्टिक, मेलडीपूर्ण आणि मूड रिफ्रेश करणारे असे या गाण्याचे वर्णन करावे लागेल.

काबील टायटल साँग : हृतिक म्हणतोय यामीला - मैं काबील हूं या नहीं
ह तिक रोशच्या आगामी ‘काबील’ चित्रपटाचे टायटल साँग ‘काबील हूं’ रीलिज करण्यात आले आहे. रोमॅण्टिक, मेलडीपूर्ण आणि मूड रिफ्रेश करणारे असे या गाण्याचे वर्णन करावे लागेल.
जुबीन नौटियाल आणि पलक मुच्चल यांच्या मधाळ स्वरांनी सजलेले हे गाणे राजेश रोशन यांनी कम्पोझ केले आहे. हृतिक आणि यामी गौतमीच्या निखळ-निर्मळ प्रेमाविषयी हे गाणे आहे.
नसीर फराज यांनी अंध प्रेमीयुगुलाची प्रकाशमय लव्हस्टोरी गीतामध्ये शब्दबद्ध केली आहे. संजय गुप्ता दिग्दर्शित ‘काबील’ चित्रपटाचा इंटेन्स ट्रेलर पाहिल्यानंतर हे गाणे कथानकाचा मूड थोडा हलकाफुलका करणारे आहे.
गाण्याचे वैशिष्ट्य म्हणजे ट्रम्पेटची धून आहे. संपूर्ण गाण्यात ऐकू येणारे ट्रम्पेट गाण्याची सिग्नेचर ट्यून आहे. म्हणून येत्या काळात अनेकजणांच्या मोबाईलची रिंगटोन म्हणून ती ऐकू आल्यास आश्चर्य वाटू देऊ नका.
![]()
हृतिकने ट्विट करून या गाण्याची झलक शेअर करून रिलीज डेटची माहिती दिली होती. तेव्हापासून ‘कानसेनां’चे कान हे गाणे ऐकण्यासाठी आतूर झाले होते.
येत्या २५ जानेवारी रोजी प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात हृतिक आणि यामी अंध जोडप्याची भूमिका साकारत आहेत. आयुष्याच्या छोट्या छोट्या गोष्टींत आनंद शोधणाऱ्या या प्रेमीयुगुलाच्या आयुष्यात अचानक असे संकट येते की, त्यांचे संपूर्ण आयुष्य पालटून जाते. शाहरुखच्या ‘रईस’सोबत ‘काबील’ची टक्कर होणार आहे.

मोजक्याच चित्रपटांना संगीत देणाऱ्या राजेश रोशनचा संगीत प्रवास मेहमुदच्या ‘कुंवारा बाप’पासून सुरू झाला होता. त्यांचे बंधू राकेश रोशनच्या चित्रपटांना त्यांनी अवीट गाण्यांनी यादगार बनवलेले आहे. ‘कहो ना प्यार है’ त्यांचे सुपरडूपर हीट अल्बम ठरला होता. २०१३ साली आलेल्या ‘क्रिश ३’नंतर राजेश रोशन परतणार म्हणूनही या सिनेमाच्या म्युझिक अल्बमविषयी उत्सुकता आहे. ‘काबील हू’द्वरे हीट गाण्यांची परंपरा कायम ठेवण्यात ते यशस्वी झाले असे म्हणावे लागेल.And they'r back! Rakesh Roshan & Rajesh Roshan’s magical melodies are here. Enjoy! Song releases tomorrow!!! pic.twitter.com/htf0QjxERS— Hrithik Roshan (@iHrithik) 5 December 2016