KAABIL DUBSMASH : यामी गौतम हिने सलमान खान आणि हृतिक रोशन यांना आणले असे एकत्र !

By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2017 11:16 AM2017-01-29T11:16:40+5:302017-01-29T17:15:44+5:30

​ हृतिक रोशन आणि सलमान खान हे काही वर्षांपूर्वी एकमेकांचे टिकाकार होते. आता तुम्ही विचाराल की कारणं काय? तर कारणं बरीच आहेत. मात्र, अनेक वर्षांनंतर या दोघांना एकत्र आणण्याचं काम यामी गौतम हिनं केलंय..तर कसे? जाणून घ्यायचंय मग वाचा...

KAABIL DUBSMASH: Yami Gautam has brought together Salman Khan and Hrithik Roshan to get together! | KAABIL DUBSMASH : यामी गौतम हिने सलमान खान आणि हृतिक रोशन यांना आणले असे एकत्र !

KAABIL DUBSMASH : यामी गौतम हिने सलमान खान आणि हृतिक रोशन यांना आणले असे एकत्र !

googlenewsNext
केश रोशन निर्मित ‘काबिल’ चित्रपट अलीकडेच रिलीज झाला. ‘काबिल’ आणि ‘रईस’ या चित्रपटांची ‘काँटें की टक्कर’ बॉक्स आॅफिसवर पाहायला मिळाली. ‘काबिल’ला समीक्षकांकडून आणि प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. त्यामुळे हृतिक रोशन आणि यामी गौतम हे दोन कलाकार सध्या जाम खुश आहेत. ते दोघे अलीकडेच ‘बिग बॉस १०’च्या ग्रँड फिनालेत आले होते. तेव्हा होस्ट सलमान खान यांच्यासोबत त्या दोघांनी बराचवेळ गप्पाटप्पा केल्या. त्यासोबतच यामी गौतमने हृतिक आणि सलमान यांना एकत्र आणण्याचे काम केले. आता तुम्ही म्हणाल कसे? तर त्याचं झालं असं की, यामीने स्टेजवर एक डबस्मॅश व्हिडीओ बनवला. ज्यात यामी मध्यभागी उभी आहे आणि दोन्ही बाजूने सलमान आणि हृतिक हे ‘काबिल’ ची सिग्नेचर स्टेप करत तिच्याकडे येतात. अतिशय सुंदर असा हा डबस्मॅश तुम्हीही नक्कीच पाहायला हवा. 

ALSO READ : ‘काबील’ची मुसंडी; कमावले १८.६७ कोटी!



ALSO READ : ​काबील या चित्रपटातील हृतिक रोशनच्या भूमिकेचे करण जोहरने केले कौतुक

‘हम दिल दे चुके सनम’ प्रदर्शित झाल्यानंतर सलमान खान आणि ऐश्वर्या रॉय यांच्यात वाद झाले. त्यानंतर तिने हृतिक रोशन याच्यासोबत ‘गुजारिश’ हा चित्रपट केला. मग सलमान खानने गुजारिशवर खुप टीका करायला सुरूवात केली.  त्यानंतर हृतिक आणि सलमान यांच्यातील संबंधही बिघडले. त्या घटनांनंतर ते दोघे अलीकडेच झालेल्या या इव्हेंटमध्ये सगळे वाद विसरून भेटले. या दोघांच्याही चाहत्यांना ते दोघे एकत्र आल्याचे पाहून आनंदच झाला असणार यात काही शंका नाही. ‘काबिल’ चित्रपटाला बॉक्स आॅफिसवर उत्तम प्रतिसाद मिळत असून यामी गौतम आणि हृतिक रोशन यांच्या अभिनयाला प्रेक्षकांची दाद मिळत आहे.  

Web Title: KAABIL DUBSMASH: Yami Gautam has brought together Salman Khan and Hrithik Roshan to get together!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.