जस्टिन बीबरनतंर भारतात होणार या फेमस पॉप सिंगरची कॉन्सर्ट

By ऑनलाइन लोकमत | Published: May 11, 2017 12:02 PM2017-05-11T12:02:41+5:302017-05-11T17:32:41+5:30

पॉप सिंगर जस्टिन बीबरचा फिव्हर अजून मुंबईवरुन उतरला सुद्धा नाही तोपर्यंत अणखीन एक ब्रिटिश पॉप सिंगर एड शीरन भारतात ...

Justin Bieber's concert of Famous Pop Singer to be held in India | जस्टिन बीबरनतंर भारतात होणार या फेमस पॉप सिंगरची कॉन्सर्ट

जस्टिन बीबरनतंर भारतात होणार या फेमस पॉप सिंगरची कॉन्सर्ट

googlenewsNext
प सिंगर जस्टिन बीबरचा फिव्हर अजून मुंबईवरुन उतरला सुद्धा नाही तोपर्यंत अणखीन एक ब्रिटिश पॉप सिंगर एड शीरन भारतात येणार असल्याचे समजते आहे. 
एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार एड शीरन 19 नोव्हेंबरला  मुंबईत येणार आहे. याची घोषणा त्याच्या ऑफिशियल वेबसाईटवर करण्यात आली आहे. हा कॉन्सर्ट नक्की कुठे होणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. विशेष म्हणजे याची माहिती तेव्हा देण्यात आली ज्यादिवशी जस्टिन बीबर वर्ल्ड टूर पर्पज साठी भारतात आला आहे.   
एड शीरन हा जगातील सर्वोत्तम सिंगर पैकी एक आहे. मार्च मध्ये आलेला तिसरा अल्बम डिवाइड खूप हिट झाला होता. या अल्बममधील 'शेप ऑफ यू'  आणि 'कैसल ऑन द हिल' ही दोनही गाणी सुपरहिट झाली होती. शेप ऑफ यू हे गाण आजही तरुणांच्या गळ्यातील ताईत बनलेले आहे. एवढेच नाही तर या गाण्याचे अनेक वर्जन भारतात बनले आहेत. या गाण्यातील डान्साची कोरियोग्राफी ही अतिशय सुंदर पद्धतीने करण्यात आली आहे.   
यावरुन एवढेच नक्कीच कळतेय की एड शीरनचे भारतातील फॅन्सची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे.एड शीरन यावर्षी जगभरातील 9 शहरांमध्ये जाऊन वर्ल्ड टूर करणार आहे. यात भारताचा ही समावेश आहे. नुकतेच जस्टिन बीबरबाबतचा लोकांसह सेलिब्रेटींमध्ये असलेली क्रेझ मुंबईने अनुभवली आहे. जस्टिनचे बॉलिवूडमध्ये ही अनेक चाहत्ये असल्याचे त्याच्या कॅन्सर्ट दरम्यान स्पष्ट झाले. त्यामुळे एड शीरनचा भारत दौऱ्याही तितकाच यशस्वी राहिल यात काही शंका नाही. तसेच एक वृत्त पत्राने दिलेल्या माहिती नुसार एड शीरव शो गेम ऑफ थ्रोन्समध्ये दिसणार आहे. 

Web Title: Justin Bieber's concert of Famous Pop Singer to be held in India

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.