धक्कादायक! ऐश्वर्या -अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी अभिनेत्रीने केला होता राडा, भरमंडपात कापली होती हाताची नस !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2020 18:12 IST2020-07-21T18:02:32+5:302020-07-21T18:12:40+5:30

ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. मुंबईमध्ये झालेल्या या ग्लॅमरस लग्नाची चर्चा जगभरात झाली होती.

Just before Abhishek and Aishwarya wedding Model Janhavi Kapoor attempted to commit suicide | धक्कादायक! ऐश्वर्या -अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी अभिनेत्रीने केला होता राडा, भरमंडपात कापली होती हाताची नस !

धक्कादायक! ऐश्वर्या -अभिषेकचे लग्न थांबवण्यासाठी अभिनेत्रीने केला होता राडा, भरमंडपात कापली होती हाताची नस !

अभिषेक आणि ऐश्वर्याने पहिल्यांदा 'ढाई अक्षर प्रेम के', 'कुछ न कहो' या सिनेमांत काम केलं होतं. एका मुलाखतीत अभिषेकने सांगितले की, 'उमराव जान' सिनेमाच्या चित्रीकरणावेळी दोघंही या नात्याबद्दल गंभीर झाले आणि त्यानंतर अभिषेकने ऐश्वर्याला प्रपोज केले होते. ऐश्वर्या राय आणि अभिषेक बच्चनने २० एप्रिल २००७ मध्ये लग्न केलं. मुंबईमध्ये झालेल्या या ग्लॅमरस लग्नाची चर्चा जगभरात झाली होती. बॉलिवूडमधील सर्वात जास्त चर्चा झालेल्या लग्नाच्या यादीत या ज्युनियर बच्चनचे लग्न गणले जाते. या कपलची लव्हस्टोरी ही जरा हटकेच आहे. अभिषेक - ऐश्वर्या यांचे लग्न आलिशान पद्धतीने पार पडले होते. लग्नात सारचे खूप आनंदीत होते. 

 

एकीकडे अभिषेक वराच्या गेटअपमध्ये तयार होता. मात्र त्याचवेळी बच्चन कुटुंबियांच्या आनंदावर विरजन पडले.  एका घटनेमुळे संपूर्ण कुटुंब हादरून गेले. आतापर्यंत सर्वत्रच आनंदी आनंद सुरू असताना असे काही घडले की, एका क्षणात सगळ्यांच्याच चेह-यावर चिेंतेचे भाव उमटले होते. लग्नाच्या दिवशी जान्हवी नावाच्या एका मॉडेलने लग्न मंडपात एंट्री घेतली तिला हे लग्न काहीही करून थांबवायचे होते. त्यामुळे तिने थेट स्वतःला संपवण्याचा प्रयत्न केला आणि थेट हाताची नसच कापली. या घटनेने सर्वत्रच खळबळ माजवली होती.

या मॉडेलने सांगितले होते की, अभिषेकने मला लग्न करण्याचे वचन दिले होते. आमचे दोघांचे एकमेकांवर प्रेम असल्याचे तिने सांगितले होते. चौकशी केल्यानंतर .या मॉडेलने जे काही केले ते निव्वळ पब्लिसिटी स्टंट असल्याचे समोर आले होते.

Web Title: Just before Abhishek and Aishwarya wedding Model Janhavi Kapoor attempted to commit suicide