याच वर्षी जूनमध्ये सोनम कपूर अडकणार आनंद आहुजासोबत लग्न बंधनात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2018 03:48 AM2018-03-24T03:48:38+5:302018-03-24T09:22:14+5:30

सोनम कपूर आणि आनंद आहुजा यांचे नातं कमेऱ्यापासून काही लपून राहिलेले नाही. अजूनपर्यंत दोघांनी कधीही अधिकृतपणे आपलं नातं स्वीकारले ...

In June this year, Sonam Kapoor will be stuck in a marriage bond with Anand Ahuja | याच वर्षी जूनमध्ये सोनम कपूर अडकणार आनंद आहुजासोबत लग्न बंधनात

याच वर्षी जूनमध्ये सोनम कपूर अडकणार आनंद आहुजासोबत लग्न बंधनात

googlenewsNext
नम कपूर आणि आनंद आहुजा यांचे नातं कमेऱ्यापासून काही लपून राहिलेले नाही. अजूनपर्यंत दोघांनी कधीही अधिकृतपणे आपलं नातं स्वीकारले नसले तरी ते बिधनास्तपणे एकत्र फिरत असतात. गेल्या आनंद नेहमीच कपूर कुटुंबीयांच्या प्रत्येक फॅक्शनमध्ये आवर्जून उपस्थित दिसतो. अनेक दिवसांपासून सोनम कपूरच्या लग्नाची बॉलिवूडमध्ये चर्चा आहे. सोनमने मात्र या गोष्टींचे खंडन केले आहे. मात्र बॉलिवूड लाईफच्या रिपोर्टनुसार सोनम आणि आनंद जूनमध्येच दोघं लग्नाच्या बेडीत अडकणार असल्याचे कळते आहे. रिपोर्टनुसार सोनम सध्या वीरे दी वेडींगच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. जूनमध्ये चित्रपट रिलीज झाल्यानंतर ती लगेच लग्न करणार आहे. यासाठी दोघांचे कुटुंबीय लंडनला जाणार आहेत. 

याआधी जूनमध्ये सोनम जोधपूरमध्ये डेस्टिनेशन वेडिंग करणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी तर सोनमने गपचुप साखरपुडा उरकला असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी झालेल्या एका पत्रकार परिषदेत सोनम कपूरच्या हातात अंगठी बघावयास मिळाली. ज्यावरून हा अंदाज वर्तविला जात आहे की, तिने साखरपुडा उरकला असावा.जेव्हा सोनमला याविषयी विचारण्यात आले तेव्हा तिनेही यास स्पष्ट शब्दात नकार न देता असे काही उत्तर दिले ज्यावरून तिने साखरपुडा उरकल्याच्या चर्चेला एकप्रकारे बळच मिळाले.    

सोनम गेल्या 4 वर्षांपासून बिझनेसमन आनंद आहुजाला डेट करते आहे. दोघांना अनेक वेळा परदेशात पार्टीत करताना आणि एकत्र फिरताना पाहण्यात आले आहे.  सोनम अनेकवेळा आनंदसोबतचे फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत असते. आनंद Bhane या फॅशन ब्रॅण्डचा मालक आहे. त्याने अमेरिकेतील व्हार्टन बिझनेस स्कूल येथून आपले शिक्षण पूर्ण केले. सोनमचा Bhane हा फेव्हरेट ब्रॅण्ड आहे. त्यामुळे बºयाचदा सोनम Bhane ने डिझाइन केलेले कपडे परिधान करून स्पॉट झाली आहे. 

ALSO READ :  See Video : ...तर यामुळे सोनम कपूरला म्हणतात ‘जिराफ’!

सोनमचा लवकरच 'वीरे दी वेडिंग' चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार बिझी आहे.या चित्रपटात सोनमशिवाय करिना कपूर, स्वरा भास्कर आणि शिखा तलसानिया यांच्या मुख्य भूमिका आहेत.‘वीरे दी वेडिंग’ चित्रपटाची कथा चार मुलींभवती फिरणारी आहे.‘वीरे दी वेडिंग’मध्ये करिना एका आधुनिक मुलीच्या भूमिकेत तर सोनम दिल्लीतील मध्यमवर्गीय मुलगी साकारणार आहे

Web Title: In June this year, Sonam Kapoor will be stuck in a marriage bond with Anand Ahuja

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.