लाइम लाइटपासून दूर राहते जुही चावलाची मुलगी, समोर आला तिचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2019 06:00 IST2019-07-02T06:00:00+5:302019-07-02T06:00:00+5:30

जुही चावला बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती आहे. मात्र इंडस्ट्रीपासून तिची फॅमिली नेहमी दूर राहते.

juhi chawla share daughter jhanvi photos write special note | लाइम लाइटपासून दूर राहते जुही चावलाची मुलगी, समोर आला तिचा फोटो

लाइम लाइटपासून दूर राहते जुही चावलाची मुलगी, समोर आला तिचा फोटो

जुही चावला बॉलिवूडमधील प्रसिद्ध व्यक्ती आहे. मात्र इंडस्ट्रीपासून तिची फॅमिली नेहमी दूर राहते. तर दुसरीकडे स्टार किड्सचे फोटो सोशल मीडियावर पहायला मिळतात. पण जुही चावलाच्या मुलांना फार कमी लोक ओळखतात.
 
जुही चावलाने तिची मुलगी जान्हवीचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोमध्ये जान्हवी शाळेच्या क्लासरूममध्ये बसलेली दिसते आहे. हा फोटो शेअर करून जुही चावलाने लिहिले की, जान्हवीने शाळेच्या फेअरवेलमध्ये आहे. एका मोमेंटला खुश आणि दुःखीदेखील. सूत्रांच्या माहितीनुसार जुही चावलाची मुलगी धीरभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकते आहे.


जुही चावलाच्या मुलीचा फोटो पाहून सोशल मीडियावर रिस्पॉन्स यायला सुरूवात झाली आहे. काही फॅन्सनी म्हटलं की, जुहीसारखीच तिच्या मुलीची स्माईल आहे. कित्येक मुलांमध्ये बसलेल्या जान्हवीला शोधणं कठीण आहे. याच कारणामुळे काही युजर्सने जुही चावलाला प्रश्न विचारला की, यातील तुझी मुलगी कोणती आहे?


जुही चावलाची दोन्ही मुलं लाइम लाइटपासून दूर राहतात. सोशल मीडियावर देखील दोघांच्या अॅक्टिव्हिटी कमी पहायला मिळते.

जुही चावला हिने १९९५ साली बिझनेसमॅन जय मेहता सोबत लग्न केलं होतं.

जुही चावला शेवटची सोनम कपूर, अनिल कपूर व राजकुमार राव यांच्यासोबत एक लडकी को देखा तो ऐसा लगा मध्ये दिसली होती.

Web Title: juhi chawla share daughter jhanvi photos write special note