जुही चावलाला इम्प्रेस करण्यासाठी जय मेहता करायचे रोज ही गोष्ट, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2019 06:00 IST2019-07-03T06:00:00+5:302019-07-03T06:00:02+5:30

जुहीला खूश करण्यासाठी जय लग्नाच्याआधी काय काय करायचे हे तिने एका मुलाखतीत सांगितले होते.

Juhi Chawla Reveals How Her Husband Jay Mehta Used To Woo Her Before They Got Married | जुही चावलाला इम्प्रेस करण्यासाठी जय मेहता करायचे रोज ही गोष्ट, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

जुही चावलाला इम्प्रेस करण्यासाठी जय मेहता करायचे रोज ही गोष्ट, वाचून तुम्हाला वाटेल आश्चर्य

ठळक मुद्देतुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जवळजवळ वर्षंभर दररोज मला जय फूलं आणि गिफ्ट्स पाठवायचे. ही रोजची फूलं आणि गिफ्ट्स पाहून जय काही काम करतो की नाही हाच प्रश्न मला पडायचा.

जुही चावलाने नव्वदीचा काळ गाजवला आहे असे म्हटले तरी ते चुकीचे ठरणार नाही. तिने कयामत से कयामत तक, हम है राही प्यार के, डर यांसारखे एकाहून एक हिट चित्रपट दिले आहेत. बॉलिवूडमधील अभिनेत्री आपल्या खाजगी आयुष्यातील फोटो नेहमीच त्यांच्या सोशल मीडियावर शेअर करत असतात. तसेच मुलाखतींमध्ये आपल्या खाजगी आयुष्याविषयी भरभरून बोलत असतात. पण जुही चावला नेहमीच आपले वैयक्तिक आणि व्यवसायिक आयुष्य वेगळे वेगळे ठेवण्याचा प्रयत्न करते.

जुहीचे लग्न जय मेहतासोबत झाले असून जय प्रसिद्ध  बिझनेसमन आहेत. जय आणि जुहीने अतिशय साधेपणाने, कोणताही गाजावाजा न करता लग्न केले होते. जय यांचे हे दुसरे लग्न असून त्यांचे पहिले लग्न यश बिर्ला यांची बहीण सुजाता बिर्ला यांच्यासोबत झाले होते. पण एका विमान अपघातात सुजाता यांचे निधन झाले. त्यांच्या निधनानंतर जवळजवळ पाच वर्षांनंतर जुही आणि जय यांचे लग्न झाले. जुही आणि जय यांच्या प्रेमकथेविषयी जुही न बोलणेच पसंत करते. पण एक लडकी को देखा तो ऐसा लगा या चित्रपटाच्या प्रमोशनच्यावेळी झुमला दिलेल्या मुलाखतीत जुहीला खूश करण्यासाठी जय लग्नाच्याआधी काय काय करायचे हे तिने सांगितले होते. 

जुहीने मुलाखतीत सांगितले होते की, तुम्हाला विश्वास बसणार नाही. पण जवळजवळ वर्षंभर दररोज मला जय फूलं आणि गिफ्ट्स पाठवायचे. ही रोजची फूलं आणि गिफ्ट्स पाहून जय काही काम करतो की नाही हाच प्रश्न मला पडायचा. माझ्या वाढदिवसाच्या दिवशी तर मला जयने ट्र्रकभरून गुलाब पाठवले होते. हे इतके गुलाब ठेवायचे कुठे हा प्रश्न मला पडला होता. 

या मुलाखतीत जुहीने पुढे सांगितले होते की, लग्नापूर्वी मला खूश करण्याची एकही संधी जय सोडत नसे. मी जिथे चित्रीकरण करत असे, तिथे तो येत असे. आम्ही एकमेकांना ओळखायला लागल्यानंतर काहीच महिन्यांत आम्ही लग्न केले. पण मी आवर्जून सांगेन, लग्नानंतर मला आता फुलं आणि कार्डस मिळत नाहीत.  

Web Title: Juhi Chawla Reveals How Her Husband Jay Mehta Used To Woo Her Before They Got Married