सिद्धार्थ-कियाराला आशीर्वाद देण्यासाठी पतीसोबत पोहोचली जुही चावला, दोघींमध्ये आहे हे खास नातं

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2023 14:48 IST2023-02-07T14:01:26+5:302023-02-07T14:48:43+5:30

अभिनेत्री जुही चावला पती जयमेहतांसोबत कियारा आणि सिद्धार्थला आर्शीवाद देण्यासाठी पोहोचली आहे. जुही चावला आणि कियारा अडवाणी यांच्यात खास नातं आहे

Juhi chawla reached jaisalmer with husband jay mehta to bless kiara advani sidharth malhotra | सिद्धार्थ-कियाराला आशीर्वाद देण्यासाठी पतीसोबत पोहोचली जुही चावला, दोघींमध्ये आहे हे खास नातं

सिद्धार्थ-कियाराला आशीर्वाद देण्यासाठी पतीसोबत पोहोचली जुही चावला, दोघींमध्ये आहे हे खास नातं

 बॉलिवूडचे लव्हबर्ड सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणी आज 7 फेब्रुवारीला जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसमध्ये सात फेरे घेणार आहेत. या आलिशान महालात दोघेही नातेवाईक आणि जवळच्या लोकांच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकतील. या लग्नासाठी या वर्हाडी मंडळीही पोहोचली असून यात करण जोहर, शाहिद कपूर, मीरा कपूर, मनीष मल्हाेत्रा, इशा अंबानी आदींचा समावेश आहे. काही पाहुणे अजूनही येतायेत. अभिनेत्री जुही चावला पती जयमेहतांसोबत कियारा आणि सिद्धार्थला आर्शिवाद देण्यासाठी पोहोचली आहे. 

जुही चावला आणि कियारा अडवाणी यांच्यात खास नातं आहे. कियारा जूहीला 'जुही आंटी' म्हणते. वास्तविक, जुही आणि कियाराचे वडील जगदीश अडवाणी हे खास मित्र आहेत आणि दोन्ही घरांमध्ये कौटुंबिक नातं आहे.

जैसलमेरच्या सूर्यगढ पॅलेसबाहेर शस्त्रांसह सुरक्षारक्षक तैनात असणार आहेत. स्पेशल सिक्युरिटीही तैनात करण्यात आली आहे. याचं कारण आहे ते म्हणजे कियाराची बालपणीची मैत्रीण आणि मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानी या विवाहसोहळ्यासाठी उपस्थित असणार आहे. ईशा कियाराची लहानपणीपासूनची खास मैत्रीण आहे. आपल्या बेस्ट फ्रेंडच्या लग्नासाठी ईशा जैसलमेरला पोहोचली आहे. यासाठीच कडक सुरक्षाव्यवस्था तैनात करण्यात आली आहे.

सिद्धार्थ व कियारा दीर्घकाळापासून रिलेशनशिपमध्ये होते. या रिलेशनशिपमध्ये अनेक चढऊतार आलेत. पण सरतेशेवटी प्रेमाचाच विजय झाला आणि आज दोघंही लग्न करणार आहेत. . काल ६ फेब्रुवारी रोजी मेहंदी आणि संगीत सोहळा पार पडला. संगीत नाईटसाठी सूर्यगढ पॅलेस गुलाबी रंगाने चमकला होता. पॅलेसचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Web Title: Juhi chawla reached jaisalmer with husband jay mehta to bless kiara advani sidharth malhotra