क्या बात! लेकीचा २१वा वाढदिवस आणि जुही चावलाने लावली तब्बल १ हजार झाडे, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2024 12:36 IST2024-02-22T12:32:31+5:302024-02-22T12:36:28+5:30

जुहीने लेकीच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तब्बल १ हजार झाडे लावली आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत जुहीने ही माहिती दिली आहे.

juhi chawla planted 1 thousand tree on her daughters birthday netizens praises her | क्या बात! लेकीचा २१वा वाढदिवस आणि जुही चावलाने लावली तब्बल १ हजार झाडे, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

क्या बात! लेकीचा २१वा वाढदिवस आणि जुही चावलाने लावली तब्बल १ हजार झाडे, अभिनेत्रीवर कौतुकाचा वर्षाव

जुही चावला ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. सालस अभिनय आणि सौंदर्याने जुही चावलाने ९०चं दशक गाजवलं. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम करून जुहीने प्रेक्षकांची मनं जिंकली. 'डर', 'कयामत से कयामत तक', 'येस बॉस', 'इश्क', 'फिर भी दिल है हिंदुस्तानी' अशा सिनेमांतून तिने अभिनयाचा ठसा उमटवला. जुही सोशल मीडियावरही प्रचंड सक्रिय असल्याचं पाहायला मिळतं. 

जुहीचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. कलाविश्वापासून सध्या दूर असलेली जुही सोशल मीडियावरुन चाहत्यांच्या संपर्कात राहते. जुहीच्या लेकीचा नुकताच २१वा वाढदिवस पार पडला. यानिमित्ताने अभिनेत्रीने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. जुहीने लेकीच्या वाढदिवसाचं निमित्त साधून तब्बल १ हजार झाडे लावली आहेत. इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत जुहीने ही माहिती दिली आहे. जुहीने तिच्या इन्स्टाग्राम प्रोफाइलवर फॅमिली फोटो शेअर केला आहे. यामध्ये पती जय मेहता आणि आपल्या दोन मुलांबरोबर दिसत आहे. या फोटोला तिने "१ हजार झाडे माझी लहान मुलगी जान्हवीसाठी...हॅपी बर्थडे," असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या पोस्टवर चाहत्यांकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.  याआधीही जुहीने तिच्या वाढदिवसानिमित्त १००० झाडे लावली होती. जुही ऑरगॅनिक शेतीला प्रोत्साहन देताना दिसते. 

१९९५ साली जुहीने जय मेहता यांच्याशी लग्नगाठ बांधत नव्या आयुष्याला सुरुवात केली होती. जय मेहता यांचं हे दुसरं लग्न आहे. त्यांच्या पहिल्या पत्नीचं निधन झाल्यानंतर त्यांनी जुहीशी लग्न करत दुसऱ्यांदा संसार थाटला. जुही आणि जय यांना जान्हवी आणि अर्जुन ही दोन मुले आहेत. 

Web Title: juhi chawla planted 1 thousand tree on her daughters birthday netizens praises her