गुटगुटीत गाल, बोलके डोळे रेखाच्या मांडीवर बसलेल्या या क्युट मुलाला तुम्ही ओळखले का ? जुना फोटो होतोय व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2022 05:55 PM2022-07-25T17:55:32+5:302022-07-25T18:13:17+5:30

2014 मध्ये गर्लफ्रेंड जास्मिन ढिल्लनशी लग्न करत संसार थाटला. जुगलची पत्नी जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. जुगल आणि जॅस्मिनला सदक नावाचा एक मुलगाही आहे.

Jugal Hansraj Childhood Photo With Rekha Viral After 40 Years | गुटगुटीत गाल, बोलके डोळे रेखाच्या मांडीवर बसलेल्या या क्युट मुलाला तुम्ही ओळखले का ? जुना फोटो होतोय व्हायरल

गुटगुटीत गाल, बोलके डोळे रेखाच्या मांडीवर बसलेल्या या क्युट मुलाला तुम्ही ओळखले का ? जुना फोटो होतोय व्हायरल

googlenewsNext

सोशल मीडियावर सध्या रेखा यांचा एक फोटो व्हायरल झाला आहे. या फोटोत रेखासोबत एक लहान मुलगा त्यांच्या मांडीवर बसल्याचं दिसतंय. रेखासोबत असलेला चिमुरडा नक्की आहे तर कोण ? हे जाणून घेण्यासाठी नेटीझन्सही हा फोटो वारंवार पाहात आहेत. काहींनी या चिमुरड्याला ओळखले तर काही मात्र तर्कवितर्क लावत त्याची ओळख पटवून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. रेखा यांच्या मांडीवर बसलेला हा चिमुरडा दुसरा तिसरा कोणी नसून तो आहे मोहब्बतें फेम हिरो जुगल हंसराज. 1984 साली प्रदर्शित झालेला चित्रपट 'झूठा सच'च्या सेटवरचा आहे.चित्रपटात रेखा आणि धर्मेंद्र यांच्या मुख्य भूमिका होत्या. 
 
जुगल हंसराजने 1983 मध्ये ‘मासूम’ या चित्रपटातून अभिनयाला सुरुवात केली होती. अनेक चित्रपटांमध्ये त्याने बालकलाकार म्हणून काम केले आहे. 1994 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘आ गले लग जा’ या चित्रपटातून जुगलने हिरो म्हणून डेब्यू केला. चॉकलेटी बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जुगलचा हा पहिला सिनेमा होता. पण हा चित्रपट सुपरडुपर फ्लॉप झाला. यानंतर 1996 मध्ये ‘पापा कहते है’ तो झळकला. या चित्रपटातील ‘घर से निकल ते ही...’, हे गाणे तुफान हिट झाले आणि जुगल सगळ्यांच्या डोळ्यात भरला. पण जुगलला खरी ओळख दिली ती ‘मोहब्बतें’ या चित्रपटाने. या चित्रपटाने तो एका रात्रीत स्टार बनला. इतका चार्मिंग दिसूनसुद्धा जुगल हंसराजला पाहिजे तसे यश मिळाले नाही.  

 

कालांतराने तो चित्रपटांपासून दूर गेला.आता तो आपल्या कुटुंबासह अमेरिकेत स्थायिक झाला आहे. 2014 मध्ये गर्लफ्रेंड जास्मिन ढिल्लनशी लग्न करत संसार थाटला. जुगलची पत्नी जॅस्मीन न्यूयॉर्कमध्ये इन्वेस्टमेंट बँकर आहे. जुगल आणि जॅस्मिनला सदक नावाचा एक मुलगाही आहे.जुगल आता ५०  वर्षांचा असून चित्रपटांमध्ये सक्रिय नसला तरी तो सोशल मीडियावर चांगलाच सक्रिय असतो. त्याचा लूकही आता पूर्वीपेक्षा खूप बदलला आहे.
 

Web Title: Jugal Hansraj Childhood Photo With Rekha Viral After 40 Years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.