नेटफ्लिक्सकडून 'जॉली एलएलबी ३' च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर, कधी स्ट्रीम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:31 IST2025-11-13T17:30:57+5:302025-11-13T17:31:35+5:30
बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर आता हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे.

नेटफ्लिक्सकडून 'जॉली एलएलबी ३' च्या ओटीटी रिलीजची तारीख जाहीर, कधी स्ट्रीम होणार?
Jolly LLB 3 OTT Release Date: प्रसिद्ध अभिनेता अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा 'जॉली एलएलबी ३' हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाल्यानंतर आता ओटीटीवर येतोय. 'जॉली एलएलबी ३' या चित्रपटात अक्षय कुमार आणि अर्शद वारसी हे प्रमुख भूमिकेत आहे. या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर चांगलं यश मिळालं. बॉक्स ऑफिसवर धमाल केल्यानंतर आता हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. याविषयीची अपडेट समोर आली आहे.
नेटफ्लिक्सने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर 'जॉली एलएलबी ३' चं पोस्टर शेअर करत ओटीटी रीलिजची घोषणा केली आहे. अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांचा कोर्टरूम ड्रामा असलेला हा चित्रपट उद्या, म्हणजेच १४ नोव्हेंबर २०२५ पासून थेट नेटफ्लिक्सवर स्ट्रीम होणार आहे. प्रेक्षक आता हा चित्रपट घरबसल्या, अगदी आरामात आपल्या स्क्रीनवर पाहू शकणार आहेत. याशिवाय अशी चर्चा आहे की हा चित्रपट जिओ हॉटस्टारवरही स्ट्रीम होऊ शकतो. दोन्ही ओटीटी प्लॅटफॉर्मने या चित्रपटाचे हक्क विकत घेतले असल्याचं समजतं, मात्र सध्या नेटफ्लिक्सनेच अधिकृत घोषणा केली आहे.
'जॉली एलएलबी ३'मध्ये अक्षय कुमार आणि अर्शद वारसी यांच्यासोबत सौरभ शुक्ला, अमृता राव आणि हुमा कुरेशी यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत. 'जॉली एलएलबी ३'चं बजेट सुमारे १२० कोटी हतं. तर, आणि या चित्रपटाने भारतात तब्बल ११७.५६ कोटी आणि जगभरात १७०.२२ कोटींची कमाई केली आहे. 'जॉली एलएलबी ३'नंतर अक्षय कुमार हा 'भूत बंगला', 'भागम भाग २', 'वेलकम टू द जंगल', 'हेरा फेरी ३' आणि 'शैतान' या चित्रपटांमध्ये झळकणार आहे.