पुन्हा वकील बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षय कुमार; 'Jolly LLB 3'ची चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2025 16:56 IST2025-08-14T16:55:36+5:302025-08-14T16:56:17+5:30

'जॉली LLB 3'मधून पुन्हा एकदा अक्षय कुमार वकीलाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या सिनेमात तो जगदीश्वर मिश्रा ही भूमिका साकारताना दिसणार आहे.

jolly llb 3 akshay kumar is all set to entertain audience in lawyer role again | पुन्हा वकील बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षय कुमार; 'Jolly LLB 3'ची चर्चा

पुन्हा वकील बनून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय अक्षय कुमार; 'Jolly LLB 3'ची चर्चा

जॉली, जॉली LLB 2 नंतर आता 'जॉली LLB 3'च्या प्रतिक्षेत प्रेक्षक आहेत. या दोन्ही सिनेमांना मिळालेलं प्रेक्षकांचं प्रेम पाहून 'जॉली LLB 3'ची घोषणा करण्यात आली होती. नुकताच या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जॉली LLB 3'मधून पुन्हा एकदा अक्षय कुमार वकीलाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 'जॉली LLB २'मध्ये साकारलेल्या अतिशय संवेदनशील पण तितकाच मनोरंजक वकील आणि केसरी २मध्ये केलेल्या दमदार अभिनयानंतर आता अक्षय कुमार 'जॉली LLB 3' या कोर्ट ड्रामासाठी सज्ज झाला आहे. 

अतिशय गंभीर भूमिकाही अगदी सहजपणे आणि मनोरंजकरित्या पडद्यावर साकारण्याचं कसब अक्षय कुमारकडे आहे. याआधीही अभिनेत्याने त्याच्या विविधांगी भूमिकांतून हे दाखवून दिलं आहे. आता 'जॉली LLB 3' या सिनेमातून पुन्हा तो वकिलाच्या भूमिकेत प्रेक्षकांना हीच जादू अनुभवायला मिळणार आहे. 'जॉली LLB 3'च्या टीझरला प्रेक्षकांकडून उत्तम प्रतिसाद मिळत आहे. आधीच्या सिनेमांप्रमाणेच 'जॉली LLB 3'मध्येही प्रेक्षकांना ड्रामा आणि कॉमेडीने भरलेली कायदेशीर लढाई पाहायला मिळणार आहे. 'जॉली LLB 3'मध्ये अक्षय कुमारसोबत अरशद वारसी आणि सौरभ शुक्लादेखील त्यांच्या मुख्य आणि आवडत्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. त्यामुळे जॉली आणि जॉली यांच्यातील रोमांचक टक्कर पडद्यावर पाहायला मिळणार आहे. 


'जॉली LLB 3' सिनेमाचं दिग्दर्शन शुभाश कपूर यांनी केलं आहे. तर आलोक जैन आणि अजित अंधारे यांनी सिनेमाची निर्मिती केली आहे. १९ सप्टेंबरला हा सिनेमा सर्वत्र प्रदर्शित केला जाणार आहे. 

Web Title: jolly llb 3 akshay kumar is all set to entertain audience in lawyer role again

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.