जॉन रूसोसोबत जमली डिप्पीची गट्टी....!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 11, 2016 10:24 IST2016-05-11T04:54:15+5:302016-05-11T10:24:15+5:30

दीपिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज ’ च्या शूटिंगसाठी लॉस एंजलिस ...

JOHN ROSO WITH THE BAPLE DAPPY BATTI ....! | जॉन रूसोसोबत जमली डिप्पीची गट्टी....!

जॉन रूसोसोबत जमली डिप्पीची गट्टी....!

पिका पदुकोन ही सध्या तिचा आगामी हॉलीवूडपट ‘ट्रिपल एक्स: द रिटर्न आॅफ एक्झांडर केज ’ च्या शूटिंगसाठी लॉस एंजलिस येथे वास्तव्यास आहे. नुकतेच तिने हुंग व्हॅनगो आणि अदिर अबेरजेल यांच्यासोबत काढलेले फोटो शेअर केले होते.

आता तिने हॉलीवूडचा फोटोग्राफर जॉन रूसोसोबत फोटो काढले आहेत. दीपिकाला ‘फास्ट अ‍ॅण्ड फ्युरियस’ हा चित्रपट आॅफर करण्यात आला होता. पण, तिने तो स्विकारला नाही यासाठी की तिने ‘बाजीराव मस्तानी’ चित्रपट देण्यात आला होता.

पण, त्यानंतर मात्र तिने हॉलीवूडमध्ये जे लक्ष घातले आहे ते पूर्णपणे स्वत:ला झोकून दिले आहे. आता ती हॉलीवूडच्या ‘ए’ लिस्टर्स अभिनेत्यांसोबत काम करताना दिसणार आहे. तिने नुकतेच आगामी बाँण्ड च्या चित्रपटासाठी आॅडिशन दिले आहे.

ट्रिपल एक्स चित्रपट अमेरिकेत २० जानेवारी २०१७ रोजी रिलीज होणार आहे. यात निना डोब्रेव्ह आणि रूबी रोस देखील आहेत. दीपिका यात ‘सेरेना युंगर’ हिची भूमिका सादर करणार आहे.

Web Title: JOHN ROSO WITH THE BAPLE DAPPY BATTI ....!