सत्यकथेवर आधारित जॉन अब्राहमचा 'तेहरान' थेट ओटीटीवर येतोय, कधी आणि कुठे पाहता येणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 16:10 IST2025-08-05T16:05:16+5:302025-08-05T16:10:46+5:30

'तेहरान' ओटीटीवर कधी आणि कुठे प्रदर्शित होत आहे?

John Abraham's Action-packed Tehran Set To Drop On Ott Know When And Where To Watch | सत्यकथेवर आधारित जॉन अब्राहमचा 'तेहरान' थेट ओटीटीवर येतोय, कधी आणि कुठे पाहता येणार?

सत्यकथेवर आधारित जॉन अब्राहमचा 'तेहरान' थेट ओटीटीवर येतोय, कधी आणि कुठे पाहता येणार?

Tehran OTT Release: बॉलिवूड अभिनेता जॉन अब्राहमने अ‍ॅक्शन आणि देशभक्तीने भरलेल्या चित्रपटांमधून नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आता तो आणखी एका थरारक चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. 'तेहरान' हा त्याचा नवीन थ्रिलर चित्रपट लवकरच प्रदर्शित होतोय. विशेष म्हणजे हा चित्रपट थिएटरमध्ये नाही, तर थेट ओटीटीवर रिलीज होणार आहे. या चित्रपटाची चाहते बऱ्याच काळापासून वाट पाहात होते. हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होत नाहीये. तर तो ओटीटीवर प्रदर्शित होणार आहे. 'तेहरान' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर आणि कुठे प्रदर्शित होत आहे, हे जाणून घ्या.

'तेहरान' मध्ये अनेक दमदार कलाकार आहेत, ज्यामध्ये जॉन अब्राहम एसीपी राजीव कुमारच्या भूमिकेत दिसणार आहे. मानुषी छिल्लरनेही चित्रपटात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. मधुरिमा तुली आणि अभिजीत लहरीसहाय्यक भूमिकेत दिसणार आहेत. अरुण गोपालन दिग्दर्शित आणि दिनेश विजन निर्मित या चित्रपटाची कथा सत्यकथेने प्रेरित आहे.  १ तास ५० मिनिटांची थ्रिलर फिल्म एसीपी राजीव कुमार (जॉन अब्राहम) यांच्या साहसी मोहिमेवर आधारित आहे. हा चित्रपट इराण आणि इस्रायल सारख्या देशांभोवती फिरतो. चित्रपटात हिंदी तसेच पर्शियन आणि हिब्रू भाषेतील संवाद आहेत, जे कथेला आंतरराष्ट्रीय रंग देतात.  आधी हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित होणार होता. पण, सिनेमाच्या कथेवरुन वाद निर्माण झाल्यानं तो ओटीटीवर प्रदर्शित करण्याचा निर्णय निर्मात्यांनी घेतला.

जॉन अब्राहमचा अ‍ॅक्शन-पॅक्ड चित्रपट ओटीटी प्लॅटफॉर्म Zee5 वर पाहू शकता. हा चित्रपट १४ ऑगस्ट २०२५ रोजी ZEE5 वर प्रदर्शित होईल. हा चित्रपट देशभक्ती आणि हेरगिरीने भरलेला आहे. याआधी जॉन हा 'द डिप्लोमॅट'मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. 'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्च २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता. भारतीय राजदूत जे. पी. सिंग आणि उज्मा अहमद यांच्या खऱ्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे. उत्कंठावर्धक प्रसंग आणि जबरदस्त अभिनयामुळे हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. जर तुम्ही हा चित्रपट पाहिला नसेल तर तो नेटफ्लिक्सवर उपलब्ध आहे.

Web Title: John Abraham's Action-packed Tehran Set To Drop On Ott Know When And Where To Watch

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.