पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करणार जॉन अब्राहम
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2018 15:12 IST2018-01-16T09:42:08+5:302018-01-16T15:12:08+5:30
जॉन अब्राहम लवकरच पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट परमाणुमध्ये दिसणार आहे. १ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक ...

पंतप्रधान नरेंद्र मोदींसाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करणार जॉन अब्राहम
ज न अब्राहम लवकरच पॉलिटिकल थ्रिलर चित्रपट परमाणुमध्ये दिसणार आहे. १ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांवर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटाचे अभिषेक शर्मा करतो आहे. सूत्रांच्या माहितीनुसार जॉन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग करणार आहे.
या चित्रपटाची निर्माती प्रेरणा अरोराने सांगितले की, आम्ही हा चित्रपट 23 फेब्रुवारीलाच रिलीज करणार आहोत. आमचा दुसरा चित्रपट परी हा फेब्रुवारी ऐवजी मार्चमध्ये रिलीज होणार आहे. परमाणु ठरल्यावेळीच आम्ही रिलीज करणार आहोत. १ आणि १३ मे १९९८ रोजी पोखरण येथे झालेल्या आण्विक चाचण्यांच्या स्मृती ताज्या करणाºया या चित्रपटात जॉन अब्राहम, डायना पेन्टी आणि बोमन इराणी अशी स्टारकास्ट आहे. अभिषेक शर्मा दिग्दर्शित या चित्रपटाची पटकथा लिहिली आहे, सैविन कदरोस आणि संयुक्ता चावला शेख यांनी.या दोघांनी याआधी ‘नीरजा’ची पटकथा लिहिली होती. ११ मे १९९८ रोजी दुपारी ३ वाजून ४५ मिनिटांनी राजस्थानातील पोखरण येथे एकाच वेळी ३ अणुस्फोट घडवून आणलेत गेले होते. यानंतर १३ मे १९९८ रोजी पुन्हा दोन अणुस्फोट घडवून आणले गेले होते. यास ‘आॅपरेशन शक्ती’ या नावाने ओळखले जाते.डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या देखरेखीखाली या चाचण्या झाल्या होत्या. खरे तर भारताने अलिप्तवादी धोरणाचा स्वीकार केला आहे. जगात शांतता निर्माण व्हावी यासाठी भारत नेहमीच प्रयत्नशील राहिला आहे. मात्र १९६२ च्या चीन आक्रमणानंतर भारताने लष्करीदृष्ट्या सक्षम होण्यासाठी, आपली संरक्षणसिद्धता जगाला दर्शविण्यासाठी १९७४ व १९९८ मध्ये पोखरण येथे अणुचाचण्या केल्या होत्या.
2016मध्ये जॉनचे तीन चित्रपट बॉक्सआॅफिसवर रिलीज झाले होते. पण हे तिन्ही चित्रपट बॉक्सआॅफिसवर फार चालू शकले नाहीत. त्यामुळे जॉनला आपल्या या आगामी चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत.