'सत्यमेव जयते'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला जॉन अब्राहम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2020 12:13 IST2020-12-25T12:13:07+5:302020-12-25T12:13:30+5:30

जॉन अब्राहम सध्या वाराणसीमध्ये सत्यमेव जयते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.

John Abraham was injured during the shooting of 'Satyamev Jayate' | 'सत्यमेव जयते'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला जॉन अब्राहम

'सत्यमेव जयते'च्या शूटिंगदरम्यान जखमी झाला जॉन अब्राहम

अभिनेता जॉन अब्राहम सध्या वाराणसीमध्ये सत्यमेव जयते चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या अॅक्शन चित्रपटासाठी जॉनला खूप मेहनत घ्यावी लागली आहे. आता असे समजते आहे की चित्रपटाच्या स्टंटदरम्यान जॉन जखमी झाला आहे. त्याच्या उजव्या हाताला दुखापत झाली आहे. त्याला दुखापत झाल्यानंतर त्याला खूप दुखायला लागले. त्यानंतर लगेचच त्याला वाराणसीतील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.


रुग्णालयातील जॉन अब्राहमचे काही फोटो समोर आले आहेत. यात जॉनचे एक्सरे रिपोर्ट चेक केले जात आहे. तो मास्क लावून डॉक्टरांसोबत उभा दिसतो आहे. मिळालेल्या माहितीनुसार जॉनला झालेली दुखापत जास्त गंभीर नाही आहे. रुग्णालयात त्याला फर्स्ट एड देण्यात आले आहे आणि तिथून तो निघाला. त्याचे चाहतेदेखील रुग्णालयाबाहेर त्याची वाट पाहताना दिसले.


सत्यमेव जयते 2 बद्दल सांगायचं तर जॉनचा हा चित्रपट 2018 साली रिलीज झालेल्या चित्रपटाचा सीक्वल आहे. चित्रपटात जॉन पोलिसाच्या भूमिकेत दिसणार आहे. तो चित्रपटात भ्रष्टाचाऱ्यांच्या मुसक्या आवळताना दिसणार आहे. चित्रपटाच्या सेटवरील बरेच फोटो व्हायरल झाले आहेत. फोर्सनंतर जॉनचा हा दुसरा चित्रपट आहे ज्यात तो जास्त एक्शन करताना दिसणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी रिलीज होणार आहे. 


जॉन अब्राहमच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर सत्यमेव जयतेशिवाय तो शाहरूख खानसोबत पठान चित्रपटात दिसणार आहे. जानेवारीमध्ये या चित्रपटाच्या शूटिंगला सुरूवात करणार आहे. यातील त्याच्या भूमिकेबद्दल अद्याप काहीही समजू शकलेले नाही. 

Web Title: John Abraham was injured during the shooting of 'Satyamev Jayate'