जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरकडे नाही ‘या’ प्रश्नाचे उत्तर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 11:18 IST2018-07-30T11:17:17+5:302018-07-30T11:18:33+5:30

‘धडक’नंतर जान्हवी व ईशानचा नवा चित्रपट कुठला तर याचे उत्तर खुद्द जान्हवी आणि ईशान या दोघांकडेही नाही.

jhanvi kapoor ishaan khattar have no film after dhadak | जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरकडे नाही ‘या’ प्रश्नाचे उत्तर!

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टरकडे नाही ‘या’ प्रश्नाचे उत्तर!

जान्हवी कपूर आणि ईशान खट्टर यांच्या ‘धडक’ या चित्रपटाने बॉक्सआॅफिसवर ६० कोटींचा पल्ला गाठला. चित्रपटातील दोघांच्या कामाचेही कौतुक झाले. पण ‘धडक’नंतर जान्हवी व ईशानचा नवा चित्रपट कुठला तर याचे उत्तर खुद्द जान्हवी आणि ईशान या दोघांकडेही नाही. होय, अलीकडे एका ताज्या मुलाखतीत दोघांनाही त्यांच्या नव्या प्रोजेक्टबद्दल विचारण्यात आले. या प्रश्नावर दोघेही निरूत्तर झालेले दिसले. ‘धडक’नंतर नवा चित्रपट कुठला? असा प्रश्न आम्हाला प्रत्येक मुलाखतीत केला जात आहे. पण हा प्रश्न आला की, आम्ही शांत बसतो, असे जान्हवी व ईशान म्हणाले. जान्हवी यावर मनमोकळेपणाने बोलली. सध्या प्रोजेक्ट पाईपलाईनमध्ये आहेत. डायरेक्टरसोबत चर्चा सुरू आहे, असे उत्तर देताना मी अनेकांना पाहिले आहे. मला ही अशी रटाळ उत्तर देणे थोडेसे विचित्र वाटते. त्यामुळे उगाच कुठला आव न आणता मी या प्रश्नावर शांत बसते, असे जान्हवी या मुलाखतीत म्हणाली. ईशानला हाच प्रश्न केल्यावर, सध्या या प्रश्नाचे माझ्याकडे कुठलेही उत्तर नाही,असे त्याने सांगितले.
एकंदर काय तर जान्हवी व ईशान यांच्याकडे सध्या काम नाही, यापेक्षा जान्हवी व ईशान हे दोघेही इतरांपेक्षा वेगळे आहेत, पडद्यामागेही तितकेच सच्चे आहेत, हेच या मुलाखतीतून दिसले.
मध्यंतरी जान्हवीसाठी पापा बोनी कपूर यांनी एक खास चित्रपट प्लान केल्याची बातमी आली होती. यापश्चात ‘बाहुबली’ फेम दिग्दर्शक एस़ एस़ राजमौली यांनीही जान्हवीला एक चित्रपट आॅफर केल्याची चर्चा होती. अर्थात अद्याप याबद्दल कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही.
जान्हवी व ईशानच्या ‘धडक’ने आत्तापर्यंत ५८ कोटी १९ लाख रूपयांची कमाई केली आहे. ‘मिशन इम्पॉसिबल’ हा हॉलिवूड चित्रपट रिलीज झाल्याने ‘धडक’च्या कमाईवर परिणाम झाल्याचे मानले जात आहे.

 

Web Title: jhanvi kapoor ishaan khattar have no film after dhadak