‘धडक’च्या स्क्रिनिंगला पोहोचली अख्खी कपूर फॅमिली, सोनम कपूरने दिला ‘फर्स्ट रिव्ह्यू’!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2018 11:46 IST2018-07-15T11:45:13+5:302018-07-15T11:46:50+5:30

श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी लेक जान्हवी कपूर हिचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ रिलीज होण्यास आता फक्त काही दिवस उरलेत.

jhanvi kapoor and ishaan khattar film dhadak screening | ‘धडक’च्या स्क्रिनिंगला पोहोचली अख्खी कपूर फॅमिली, सोनम कपूरने दिला ‘फर्स्ट रिव्ह्यू’!!

‘धडक’च्या स्क्रिनिंगला पोहोचली अख्खी कपूर फॅमिली, सोनम कपूरने दिला ‘फर्स्ट रिव्ह्यू’!!

श्रीदेवी आणि बोनी कपूरची लाडकी लेक जान्हवी कपूर हिचा डेब्यू सिनेमा ‘धडक’ रिलीज होण्यास आता फक्त काही दिवस उरलेत. येत्या शुक्रवारी करण जोहरच्या ‘धर्मा’ प्रॉडक्शनचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येतो आहे. साहजिकच जान्हवीला पडद्यावर पाहण्यासाठी लोक उत्सूक आहेत.
काल रात्री या चित्रपटाचे स्पेशल स्क्रिनिंग पार पडले. यावेळी जान्हवीचे अख्खे कुटुंब यावेळी हजर होते. 

वडिल बोनी कपूर, बहीण खूशी कपूर, काका संजय कपूर, चुलत बहीण सोनम कपूर, रिया कपूर असे सगळे ‘धडक’च्या स्पेशल स्क्रिनिंगला पोहोचले. 

चित्रपट पाहिल्यानंतर सर्वांनी जान्हवीवर कौतुकाचा वर्षाव केला. कपूर कुटुंबाच्या अगदी जवळचा मित्र मनीष मल्होत्रा हा सुद्धा यावेळी दिसला. 

 विशेषत: जान्हवीची चुलत बहीण सोनम कपूर ही तर जान्हवीचा डेब्यू सिनेमा पाहून दंग झाली.  तिने लगेच ट्विट करून आपल्या या भावना व्यक्त केल्यात.


 ‘जान्हवी कपूर तू धमाकेदार डेब्यू केला आहेस. मला तुझा अभिमान आहे. तुझ्या कौतुकासाठी माझ्याजवळ शब्दचं नाहीत. ईशान खट्टर तू सुद्धा अप्रतिम काम केलेस. या शानदार चित्रपटाचे क्रेडिट दिग्दर्शक शशांक खेतान यालाही जाते. दोन्ही कलाकारांचे निष्पापपण, त्यांचे सौंदर्य त्याने  अनोख्या पद्धतीने पडद्यावर दाखवलेय,’असे सोनमने लिहिले.




तुम्हाला ठाऊक आहेच की, ‘धडक’चे शूटींग सुरू असतना जान्हवीची आई श्रीदेवी यांचे अचानक निधन झाले होते. आईच्या मृत्यूच्या १३ दिवसानंतर जान्हवी शूटींगवर परतली होती. आईच्या मृत्यूनंतरचा प्रत्येक क्षण तिने अतिशय धीराने हाताळला.

 

Web Title: jhanvi kapoor and ishaan khattar film dhadak screening