Madhuri Dixit :  भाई, चेहऱ्याची वाट लावली..., माधुरी दीक्षितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2022 11:32 IST2022-09-06T11:11:02+5:302022-09-06T11:32:34+5:30

Madhuri Dixit :  माधुरीच्या सौंदर्याचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत. पण एक व्हिडीओ समोर व्हायरल झाला आणि अनेकांनी माधुरीला ट्रोल करायला सुरूवात केली.

jhalak dikhhla jaa 10 madhuri dixit video going viral netizen saying too much botox | Madhuri Dixit :  भाई, चेहऱ्याची वाट लावली..., माधुरी दीक्षितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स

Madhuri Dixit :  भाई, चेहऱ्याची वाट लावली..., माधुरी दीक्षितचा व्हिडीओ पाहून नेटकऱ्यांच्या भलत्याच कमेंट्स

बॉलिवूडची ‘धकधक गर्ल’ माधुरी दीक्षित (Madhuri Dixit ) शानदार अभिनयासोबतच तिच्या मनमोहक हास्यासाठी ओळखली जाते. सध्या माधुरी ‘झलक दिखला जा 10’  (Jhalak Dikhhla Jaa 10 )जज करतेय. तिच्यासोबत करण जोहर आणि नोरा फतेही हेही जजच्या भूमिकेत आहेत. ‘झलक दिखला जा’ हा शो पाच वर्षानंतर टीव्हीवर परतला आहे. पण तूर्तास चर्चा या शोची नाही तर माधुरीच्या दिसण्याची आहे. होय, माधुरीच्या सौंदर्याचं कौतुक करताना चाहते थकत नाहीत. पण एक व्हिडीओ समोर व्हायरल झाला आणि अनेकांनी माधुरीला ट्रोल करायला सुरूवात केली. तिच्या सौंदर्याची प्रशंसा करण्याऐवजी इंटरनेटवर भलतीच चर्चा सुरू झाली.

आता या व्हिडीओत असं काय आहे? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर या व्हिडीओत माधुरी काहीशी वेगळी दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावरचं हास्यही बदलेलं दिसतंय. नेमकी हीच गोष्ट युजर्सनी हेरली आणि मग माधुरीने सर्जरी केल्याची चर्चा सुरू झाली. ‘झलक दिखला जा’च्या सेटवरचा व्हिडीओ सेलिब्रिटी फोटोग्राफर विरल भयानीने शेअर केला आहे. यात माधुरी लाल रंगाच्या पोलका डॉट साडीत दिसतेय. माधुरी पापाराझींना पोझ देतेय. पण हा व्हिडीओ पाहून युजर्सनी भलत्याच कमेंट्स केल्या आहेत.

तू सर्जरी केली आहेस का? बोटॉक्स केलं आहेस का? असे एक ना एक प्रश्न सध्या लोक विचारत आहेत. भाई, चेहऱ्याची वाट लावली, अशी कमेंट एका युजरने केली आहे. ही आता भारतीय कमी अन् जपानी जास्त दिसू लागलीये. हा बोटाक्सचा परिणाम आहे, असं एका युजरने लिहिलं. हिने आपल्या चेहऱ्याचं काय केलं? असा प्रश्न तर अनेकांनी केला. अर्थात अनेकांनी तिचा बचावही केला. तिने सर्जरी केली नसून मेकअप जास्त झाला आहे, असं म्हणत काही चाहत्यांनी माधुरीची बाजू सांभाळली.  

माधुरी नुकतीच नेटफ्लिक्सच्या ‘फेम गेम’ या वेबसीरिजमध्ये दिसली होती. तिच्या कामाची बरीच प्रशंसा झाली. लवकरच ‘मजा मा’ नावाच्या एका चित्रपटातून ती पुन्हा ओटीटीवर झळकणार आहे. संजय लीला भन्साळी यांच्या ‘हीरामंडी’ या वेबसीरिजमध्येदेखील माधुरी झळकणार असल्याची चर्चा आहे.

Web Title: jhalak dikhhla jaa 10 madhuri dixit video going viral netizen saying too much botox