या व्यक्तीमुळे जया प्रदा यांनी केला होता तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2017 17:20 IST2017-10-14T09:40:14+5:302017-10-14T17:20:20+5:30
बॉलिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जया प्रदा यांना लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची ...

या व्यक्तीमुळे जया प्रदा यांनी केला होता तीनवेळा आत्महत्येचा प्रयत्न
ब लिवूड अभिनेत्री जया प्रदा यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक हिट चित्रपट दिले आहेत. जया प्रदा यांना लहानपणापासून अभिनय आणि नृत्याची आवड होती. 80 च्या दशकात त्यांनी अनेक अभिनेत्रींना टक्कर दिली होती. याच कारणामुळे हेमा मालिनी आणि श्रीदेवी यांच्यासारख्या अभिनेत्रीसुद्धा त्यांच्यासोबत काम करायला सहजा-सहजी तयार व्हायच्या नाहीत. इतर अभिनेत्रींच्या तुलनेत जया प्रदा यांचे मानधन अधिक असायचे. चित्रपटांमध्ये जास्त मानधन आकारल्यामुळे बॉलिवूडमध्ये त्यांचे अनेक शत्रू निर्माण झाले होते. लवकरच त्या इनकम टॅक्सच्या रडावर आल्या. इनकम टॅक्सच्या अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा मारला आणि त्यांचे सगळे अकाऊंट सील केले होते.
त्याच दरम्यान त्यांच्या आयुष्यात श्रीकांत नहाटाच्या यांची एंट्री झाली. श्रीकांत यांनी त्यांची इनकम टॅक्सच्या कचाट्यातून बाहेर पडण्यासाठी मदत केली. यानंतर जया प्रदा श्रीकांत यांच्यावर इंप्रेस घेऊन त्यांच्या प्रेमात पडल्या. नहाटा आधीपासूनच विवाहित होते. त्यांना पहिल्या पत्नीपासून तीन मुलंही होती. मात्र तरही जया प्रदा त्यांच्याशी विवाह करण्यास तयार झाल्या आणि 1986 साली दोघांनी लग्न केले. श्रीकांत यांची पहिली पत्नी चंद्रा यांनी घटस्फोट देण्यास नकार दिला आणि जया प्रदा यांना मारहाणसुद्धा केली. चंद्रा यांच्या या व्यवहारामुळे जया प्रदा दु:खी झाल्या आणि त्यांनी तब्बल तीनवेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. लोकांना हे समजल्यानंतर चंद्रा नहाटा आपल्या पतीला जया प्रदा यांच्यासोबत शेअर करण्यास तयार झाल्याचे काही लोक सांगतात. मात्र काही दिवसांनंतर जया स्वत:च श्रीकांत नहाटा यांच्या आयुष्यातून दूर निघून गेल्या.
जयाप्रदा यांचे खरे नाव ललिता राणी होते. त्यांचा जन्म आंध्रप्रेदशमधील राजमुंदरी या गावी 3 एप्रिल 1962 साली झाला होता. वयाच्या 14 व्या वर्षी त्यांनी आपल्या शाळेतील वार्षिक स्नेहसंमेलनात नृत्य सादर केले होते. यावेळी प्रेक्षकांमध्ये एक दिग्दर्शकसुद्धा बसले होते. त्यांना जयाचे नृत्य इतके आवडले की त्यांनी जया यांना भूमिकोसम या चित्रपटात तीन मिनिटांचे नृत्य सादर करायला सांगितले. त्यांच्या आई-वडिलांनी त्यांना या चित्रपटात नृत्य करण्यासाठी प्रोत्साहित केले होते.