जावेद जाफरी आहे कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक, कमाईचा आकडा वाचून येईल भोवळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2021 12:55 IST2021-12-04T12:46:10+5:302021-12-04T12:55:47+5:30

इंडस्ट्रीत विनोदी कलाकार म्हणून त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे.

Javed jaffrey birthday he turns 58 now know his career net worth salary | जावेद जाफरी आहे कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक, कमाईचा आकडा वाचून येईल भोवळ

जावेद जाफरी आहे कोट्यावधी रूपयांच्या संपत्तीचा मालक, कमाईचा आकडा वाचून येईल भोवळ

जावेद जाफरी हा बॉलिवूडमधील लोकप्रिय चित्रपट अभिनेत्यांपैकी एक आहेत. इंडस्ट्रीत विनोदी कलाकार म्हणून त्याने स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. जावेद जाफरी त्याच्या नृत्य कौशल्यासाठी देखील ओळखला जातो. बूगी वूगी या लोकप्रिय रिअॅलिटी टीव्ही डान्स शोचा तो अनेकवर्षे जज होता.  आज  त्याचा 58 वा वाढदिवस  आहे, या निमित्ताने त्याचे करिअर, नेट वर्थ आणि त्याच्याशी संबंधित इतर खास गोष्टींवर एक नजर टाकूया.

जावेद जाफरीने सुभाष घई यांच्या मेरी जंग या चित्रपटातून पदार्पण केले. त्याचे बोल बेबी बोल हे गाणे हिट झाले होते. हे गाणे त्याने किशोर कुमार यांच्यासोबत गायल्याचे फार लोकांना माहीत नाही.

कोटींचा मालक
जावेद जाफरीने अनेक चित्रपटांमध्ये काम करण्यासोबतच वॉईस ओवरचेही काम केलं. त्याचा आवाज चांगला आहे, त्यामुळे त्याला अनेक शो होस्ट करण्याची संधीही मिळाली. कमाईबद्दल बोलायचे झाले तर, जाफेद जाफरची एकूण संपत्ती 51 कोटी म्हणजे 51 मिलियन डॉलर्स इतकी आहे. जावेद जाफरी याचे मासिक उत्पन्न ४५ लाखांपेक्षा जास्त आहे. जावेद जाफरी एका चित्रपटात काम करायचे  2 ते 3 कोटी घेतो. ब्रँड एंडोर्समेंट्स, चित्रपट, शो आणि टीव्ही जाहिराती हा त्याच्या उत्पन्नाच स्रोत आहे. एका ब्रँडच्या जाहिरातीसाठी तो 50 ते 60 लाख रुपये आकारतो. जावेद जाफरीचे वार्षिक उत्पन्न 6 कोटींहून अधिक आहे.

 

वैयक्तिक आयुष्य 
जावेद जाफरी त्याच्या खाजगी आयुष्याविषयी कधीही बोलणे टाळतो. जावेद जाफरीचे लग्न हबिबा जाफरीसोबत झालेले असून त्यांना मीजान, अब्बास आणि अल्विरा अशी तीन मुले आहेत. जावेद जाफरीचे हबिबाच्या आधी एका प्रसिद्ध अभिनेत्रीसोबत लग्न झाले होते. ही अभिनेत्री दुसरी कोणी नसून हिना या प्रसिद्ध चित्रपटात झळकलेली जेबा बख्तियार आहे. हिना या चित्रपटात जेबाने ‘हिना’ नावाच्या मुलीची भूमिका साकारली होती. ‘मैं हू खुशरंग हिना’ हे या चित्रपटाचे गाणे तुफान लोकप्रिय झाले होते. जेबा आणि जावेद यांनी लपूनछपून लग्न केले होते. पण काहीच महिन्यांमध्ये ते दोघे वेगळे झाले. 

Web Title: Javed jaffrey birthday he turns 58 now know his career net worth salary