फराह खानच्या 'या' चित्रपटावर येणार जपानी नाटक...वाचा सविस्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2017 15:13 IST2017-07-19T09:37:58+5:302017-07-19T15:13:12+5:30

फराह खान दिग्दर्शित 2007 मध्ये आलेला 'ओम शांती ओम' चित्रपट सुपरहिट झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनासह समीक्षकांनादेखील आवडला होता. ...

Japanese drama on Farah Khan's 'This' movie ... read detailed | फराह खानच्या 'या' चित्रपटावर येणार जपानी नाटक...वाचा सविस्तर

फराह खानच्या 'या' चित्रपटावर येणार जपानी नाटक...वाचा सविस्तर

ाह खान दिग्दर्शित 2007 मध्ये आलेला 'ओम शांती ओम' चित्रपट सुपरहिट झाला होता. हा चित्रपट प्रेक्षकांनासह समीक्षकांनादेखील आवडला होता. यातून दीपिका पादुकोणने बॉलिवूडमध्ये डेब्यू केले होते. दीपिका आणि शाहरुख खानची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावली होती. ओम शांती ओम भारतासह परदेशात ही रिलीज झाला होता. जपानच्या चित्रपट गृहांमध्ये गेल्या 3 वर्षांपासून हा चित्रपट चालू आहे. आता जपानमध्ये या चित्रपटावर आधारित एक म्युझिकल नाटक सुरु होणार आहे.     
जपानमधल्या तकाराजुका थिएटर ग्रुपव्दारे हे नाटक सादर करण्यात येणार आहे. 22 जुलैपासून हे नाटक प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या नाटकाच्या प्रिमीअर सोहळ्याला फराह खानला मुख्य अतिथी म्हणून आमंत्रित करण्यात आले आहे. पहिल्यांदाच भारतीय चित्रपटावर जपानमध्ये नाटक तयार करण्यात येते आहे. ही भारतीय चित्रपटासाठी सन्मानाची गोष्ट आहे. फराह खानदेखील या गोष्टीमुळे खूश आहे. हे आमंत्रण स्वीकारत फराह खान 19 जुलैला जपानसाठी रवाना होणार आहे. फारह खान म्हणाली, ''भारतीय चित्रपटावर आधारित जपानमध्ये म्युझिकल नाटक येणे ही निश्चित एक मोठी गोष्ट आहे. तसेच ही गोष्टी माझ्यासाठी अभिमानास्पद आहे. यावरुन एक गोष्ट स्पष्ट होते की भले ही आपले देश वेगवेगळे आहेत मात्र आपल्या भावना सारख्याच आहेत. ज्या प्रमाणे ओम शांती ओम चित्रपटाने जगभरातील रसिकांचे मनोरंजन केले तसेच हे नाटकदेखील रसिकांचे मनोरंजन करत मनं जिंकेल. 
फराह खान ओम शांती ओम चित्रपटातून दीपिका पादुकोणला पदार्पणातच चांगलेच यश मिळाले होते. या चित्रपटातील गाणी देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती.      

Web Title: Japanese drama on Farah Khan's 'This' movie ... read detailed