अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 4, 2023 18:10 IST2023-12-04T18:09:32+5:302023-12-04T18:10:12+5:30

जान्हवी शिखर पहाडियाबरोबर उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाला गेली होती. तेथील मंदिरातील जान्हवीचा व्हिडिओ समोर आला आहे.

janhvi kapoor spotted at mahakal temple ujjain with shikhar pahariya video viral | अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल

अफेअरच्या चर्चांदरम्यान जान्हवी कपूरचं बड्या नेत्याच्या नातवाबरोबर महाकाल दर्शन, व्हिडिओ व्हायरल

बॉलिवूड सेलिब्रिटींचे अफेअर हा कायमच चर्चेचा विषय राहिलेला आहे. सध्या सिनेसृष्टीतही प्रेमाचे वारे वाहत असल्याचं दिसत आहे. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरच्या अफेरच्या चर्चा रंगल्या आहेत. जान्हवी आणि शिखर पहाडिया एकमेकांना डेट करत असल्याच्या चर्चा आहेत. त्यांना अनेक ठिकाणी एकत्र स्पॉटही करण्यात आलं होतं. आता त्यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

जान्हवी शिखर पहाडियाबरोबर उज्जैन येथील महाकालच्या दर्शनाला गेली होती. तेथील मंदिरातील जान्हवीचा व्हिडिओ समोर आला आहे. या व्हिडिओत जान्हवी महादेवाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचं दिसत आहे.  शिखर पहाडिया आणि जान्हवी महाकालच्या मंदिरात इतर भाविकांबरोबर जमिनीवर बसल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. जान्हवीने गुलाबी रंगाची साडी नेसून पारंपरिक लूक केल्याचंही दिसत आहे. उज्जैनच्या महाकाल मंदिरातील जान्हवी आणि शिखर पहाडियाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

दरम्यान, जान्हवी आणि शिखर पहाडिया रिलेशनशिपमध्ये असल्याचं कंन्फर्म झालं आहे. शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदे यांची लेक स्मृती पहाडिया यांचा शिखर मुलगा आहे.  

Web Title: janhvi kapoor spotted at mahakal temple ujjain with shikhar pahariya video viral