जेव्हा जान्हवी कपूर राजकुमार रावला म्हटली होती आय लव्ह यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2019 13:21 IST2019-04-12T13:19:35+5:302019-04-12T13:21:34+5:30

राजकुमार रावच्या फॅनच्या यादीत अभिनेत्री जान्हवी कपूरचा देखील समावेश होतो. तिनेच ही गोष्ट नुकतीच फिट अप विथ स्टार्समध्ये सांगितली आहे.

Janhvi Kapoor says she wrote ‘I love you’ on Rajkummar Rao’s Instagram posts, here’s his response | जेव्हा जान्हवी कपूर राजकुमार रावला म्हटली होती आय लव्ह यू

जेव्हा जान्हवी कपूर राजकुमार रावला म्हटली होती आय लव्ह यू

ठळक मुद्देमी एकदा राजकुमारच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर आय लव्ह यू असे लिहिले होते. ही गोष्ट मी ज्यावेळी केली होती, त्यावेळी मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते. तसेच माझे इन्स्टाग्रामचे पेज देखील व्हेरिफाईड नव्हते.

राजकुमार रावने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला रण या चित्रपटात एक छोटीशी भूमिका साकारली होती. त्यानंतर तो लव्ह सेक्स और धोका, रागिणी एमएमएस, शैतान, गँग्स ऑफ वासेपूर 2, तलाश, काय पो छे यांसारख्या चित्रपटांमध्ये झळकला. त्याने गेल्या काही वर्षांत न्यूटन, स्त्री, शादी में जरुर आना यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या आहेत. आज बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये त्याची गणना केली जाते. त्याच्यासोबत काम करण्याची इच्छा आज बॉलिवू़डमधील अनेक कलाकारांची आहे. त्याचे फॅन फॉलोव्हिंग तर प्रचंड आहे. त्याच्या फॅन्स मध्ये महिला फॅन्सची संख्या ही अधिक आहे आणि त्यातही सामान्य लोकच नव्हे तर बॉलिवूडमधील मंडळी देखील त्याचे फॅन्स आहेत. बॉलिवूडमधील एक अभिनेत्री राजकुमारची खूप मोठी फॅन असल्याचे तिने नुकतेच सांगितले आहे. 

राजकुमार रावच्या फॅनच्या यादीत अभिनेत्री जान्हवी कपूरचा देखील समावेश होतो. तिनेच ही गोष्ट नुकतीच फिट अप विथ स्टार्समध्ये सांगितली आहे. जान्हवी राजकुमारची किती मोठी फॅन आहे याविषयी तिने या कार्यक्रमात खुलासा केला आहे.

तिने सांगितले आहे की, मी एकदा राजकुमारच्या इन्स्टाग्रामच्या पोस्टवर आय लव्ह यू असे लिहिले होते. ही गोष्ट मी ज्यावेळी केली होती, त्यावेळी मी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले नव्हते. तसेच माझे इन्स्टाग्रामचे पेज देखील व्हेरिफाईड नव्हते. त्यामुळे माझ्या या पोस्टकडे कोणाचे लक्ष गेले नव्हते. राजकुमारने देखील माझ्या आय लव्ह यू ला रिप्लाय दिला नव्हता. पण जान्हवीने ज्यावेळी बॉलिवूडमध्ये पदार्पण केले, त्यावेळी राजकुमारने तिला रिप्लाय दिला होता. 

जान्हवीने धडक या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या चित्रपटातील तिच्या भूमिकेचे चांगलेच कौतुक झाले होते. आता तिची जोडी लवकरच राजकुमार राव सोबत रुह-अफ्जा या चित्रपटामध्ये जमणार आहे. राजकुमार सोबत काम करण्यासाठी जान्हवी खूपच उत्सुक आहे. या चित्रपटात या दोघांसोबतच वरुण शर्मा देखील महत्त्वाच्या भूमिकेत आहे.

Web Title: Janhvi Kapoor says she wrote ‘I love you’ on Rajkummar Rao’s Instagram posts, here’s his response