जान्हवी कपूर लगीनघाई! लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2021 13:48 IST2021-08-02T13:48:26+5:302021-08-02T13:48:42+5:30

जान्हवीने तर आतापासून तिच्या लग्नाची तयारी करायला सुरुवात केली आहे.

Janhvi Kapoor is rushing! Preparations for the wedding were also completed | जान्हवी कपूर लगीनघाई! लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण

जान्हवी कपूर लगीनघाई! लग्नाची तयारीदेखील झाली पूर्ण

बॉलिवूडची धडक गर्ल जान्हवी कपूरने अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजविले. तिचे लाखो चाहते आहे. तिच्याबद्दल जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूपच उत्सुक असतात. जान्हवीकडे अनेक प्रोजेक्ट्स असले तरीदेखील ती तिच्या खासगी आयुष्यालाही तितकेच महत्त्व देताना दिसते. आता तर असे समजते आहे की जान्हवीने तिच्या लग्नाच्या तयारीला सुरूवात केली आहे.

जान्हवी कपूरने नुकतेच पिकॉक मासिकाला मुलाखत दिली. यावेळी तिने तिच्या लग्नाच्या प्लानिंगबद्दल सांगितले. तिने तिच्या बॅचलरेट पार्टीपासून तिच्या लग्नापर्यंत सगळ्या गोष्टी ठरवल्या आहेत. तिला साधेपणाने लग्न करायचे आहे. तिच्या विवाह सोहळा जास्त दिवसांचा नको आहे, फक्त दोन दिवसांत सगळ्या गोष्टी पार पडल्या पाहिजेत, असे तिने सांगितले.


जान्हवी कपूरची बॅचलरेट पार्टी ही कॅप्री किंवा यॉटवर असेल. मेहेंदी आणि संगीतचा कार्यक्रम हा मयलापुरमध्ये तिची आई म्हणजेच अभिनेत्री श्रीदेवीच्या घरी असेल. तिला लग्न तिरुपतीत करायचे आहे. तिला रिसेप्शन ठेवण्याची इच्छा नाही.

तर लग्नाच्या डेकोरेशनबद्दल जान्हवी सांगते की, तिला सर्वकाही पारंपारिक पाहिजे, तर मोगरा आणि मेणबत्त्यांची सजावट हवी आहे. लग्नात ती कांजीवरम साडी नेसेल.  ब्राइड्समेड म्हणून बहिण खुशी, अंशुला आणि तिची जवळची मैत्रिण तनिषा असेल.  नवरा कसा असेल या प्रश्नावर जान्हवी म्हणाली, आशा आहे की तो एक समजूतदार माणूस असेल, कारण मी अजून अशा व्यक्तीला भेटली नाही.

जान्हवी कपूरच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचे तर तिने २०१८ मध्ये धडक या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. त्यानंतर ‘गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल’मध्ये ती झळकली होती. रूही चित्रपटात ती दुहेरी भूमिकेत दिसली. या चित्रपटातील तिच्या कामाचे कौतुक झाले. आता ती गुड लक जेरी आणि दोस्ताना २ या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.

Web Title: Janhvi Kapoor is rushing! Preparations for the wedding were also completed