जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, रुग्णालयात ॲडमिट; कालपासूनच अस्वस्थ असल्याचा मित्राचा खुलासा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2024 17:31 IST2024-07-18T17:30:39+5:302024-07-18T17:31:43+5:30
गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकार अंबानींच्या सोहळ्यात व्यस्त होते. जान्हवीनेही प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधून घेतलं होतं

जान्हवी कपूरची तब्येत बिघडली, रुग्णालयात ॲडमिट; कालपासूनच अस्वस्थ असल्याचा मित्राचा खुलासा
बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूरला (Janhvi Kapoor) आज रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. कालपासून तिची तब्येत बरी नसल्याची माहिती आहे. फूड पॉयझनिंग झाल्याने तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड कलाकार अंबानींच्या सोहळ्यात व्यस्त होते. जान्हवीनेही प्रत्येक इव्हेंटमध्ये आपल्या ग्लॅमरस लूकने लक्ष वेधून घेतलं होतं. एकंदर बिझी शेड्युलमुळे आणि फूड पॉयझनिंगमुळे तिची तब्येत बिघडल्याचं तिच्या एका मित्राने सांगितलं.
'टाइम्स नाऊ'च्या रिपोर्टनुसार, जान्हवी कपूर काल दिवसभर बेड रेस्टवर होती. आजही तब्येतीत सुधारणा न झाल्याने तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तब्येत जास्तच बिघडल्याने तिला अॅडमिट करण्यात आले. तिच्या एका मित्राने 'झूम'ला ही माहिती दिली. तो म्हणाला, "फूड पॉयझनिंगची ही गंभीर समस्या आहे. काल बुधवारी जान्हवी बेडवरच होती. तिला अशक्तपणा आला होता. काल तिने सर्व काम, मीटिंग्स रद्द केल्या. आज तिच्या कुटुंबियांना डॉक्टरांचा सल्ला घेणंच योग्य वाटलं. म्हणून तिला दवाखान्यात नेण्यात आलं. उद्यापर्यंत तिला डिस्चार्ज मिळू शकतो."
जान्हवी लवकर बरी व्हावी म्हणून चाहते प्रार्थना करत आहेत. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या हळद, संगीत, लग्न, आशीर्वाद सोहळा आणि रिसेप्शनमध्ये जान्हवीच्या लूकने लक्ष वेधलं होतं. अनेकांनी जान्हवीच नवरी दिसत असल्याची कमेंटही केली होती. तसंच या सोहळ्यांमध्ये ती बॉयफ्रेंड शिखर पहाडियासोबत हातात हात घालून होती.