माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या हातात हात अन्...; बॉयफ्रेंड शिखर पहारियासह लंडनच्या रस्त्यावर दिसली जान्हवी कपूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2025 17:03 IST2025-06-19T17:03:06+5:302025-06-19T17:03:33+5:30

जान्हवी आणि शिखर पहारिया एकमेकांसोबत लंडनमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत. लंडनमध्ये ते एकत्र व्हॅकेशनसाठी गेले आहेत. व्हॅकेशनमधील त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे.

janhvi kapoor enjoying vacation in london with bf shikhar pahariya video | माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या हातात हात अन्...; बॉयफ्रेंड शिखर पहारियासह लंडनच्या रस्त्यावर दिसली जान्हवी कपूर

माजी मुख्यमंत्र्यांच्या नातवाच्या हातात हात अन्...; बॉयफ्रेंड शिखर पहारियासह लंडनच्या रस्त्यावर दिसली जान्हवी कपूर

बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर आणि शिखर पहारिया यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरू आहेत. जान्हवी आणि शिखर पहारिया गेल्या कित्येक वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. अनेक ठिकाणी त्यांना एकत्र स्पॉटही करण्यात आलं आहे. काही वेळेस जान्हवी आणि शिखर एकत्र देवदर्शनासाठीही गेले आहेत. तर अनेक इव्हेंटमध्ये ते एकमेकांसोबत दिसले. आता जान्हवी तिच्या बॉयफ्रेंडसह लंडनमध्ये व्हॅकेशन एन्जॉय करत आहे. 

जान्हवी आणि शिखर पहारिया एकमेकांसोबत लंडनमध्ये क्वालिटी टाइम घालवत आहेत. लंडनमध्ये ते एकत्र व्हॅकेशनसाठी गेले आहेत. व्हॅकेशनमधील त्यांचा व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडिओत जान्हवी आणि शिखर पहारिया दिसत आहे. एकमेकांच्या हातात हात घालून ते लंडनच्या रस्त्यांवर फेरफटका मारत असल्याचं पाहायला मिळत आहे. जान्हवी-शिखरचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 


दरम्यान, शिखर पहारिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आणि आमदार प्रणिती शिंदे यांचा भाचा आहे. सुशीलकुमार शिंदे यांची मुलगी स्मृती शिंदे यांचा तो मुलगा आहे. जान्हवी आणि शिखर कॉलेजपासून सोबत आहेत. तेव्हाच त्यांच्या रिलेशनशिपला सुरुवात झाली होती. मधल्या काळात त्यांच्यात दुरावा आला होता. मात्र नंतर ते पुन्हा एकत्र आले. 

Web Title: janhvi kapoor enjoying vacation in london with bf shikhar pahariya video