जान्हवी कपूरनं चक्क चालवला रिक्षा, मनीष पॉलने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2025 15:41 IST2025-09-24T15:32:16+5:302025-09-24T15:41:06+5:30
मनीष पॉलने जान्हवी कपूरचा चक्क रिक्षा चालवतानाचा मजेशीर व्हिडीओ शेअर केलाय.

जान्हवी कपूरनं चक्क चालवला रिक्षा, मनीष पॉलने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
Janhvi Kapoor Drives An Auto Rickshaw: बॉलिवूडचा आगामी चित्रपट 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' सध्या चर्चेत आहे. या चित्रपटाच्या सेटवरील अनेक मजेदार BTS व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. नुकताच अभिनेता मनीष पॉलने त्याच्या इन्स्टाग्रामवर एक असाच व्हिडीओ शेअर केला आहे. ज्यात अभिनेत्री जान्हवी कपूर रिक्षा चालवताना दिसत आहे.
समोर आलेल्या व्हिडीओमध्ये मनीष पॉल रिक्षाच्या मागच्या सीटवर बसला आहे. तो गंमतीत म्हणतो, "भाऊ, मी एक खूप महागडा माणूस आहे. मी एका नवीन रिक्षाचालकाला कामावर ठेवला आहे" यावर जान्हवी कपूर रिक्षा चालवताना कॅमेऱ्याकडे बघत हसते. मनीषने हा व्हिडीओ शेअर करताना कॅप्शनमध्ये म्हटलं की, "कूकूची सवारीसुद्धा अपग्रेड झाली... ड्रायव्हर आहे स्वतः तुलसी कुमारी! आम्हाला शूटिंग करताना मजा आली". जान्हवी कपूरच्या मागे वरुण धवन देखील ऑटो चालवत होता, असेही मनीषनं सांगितलं. मनीष पॉलने शेअर केलेल्या या व्हिडीओवर जान्हवीने कमेंट केली. स्वात:चेच कौतुक करत "बेस्ट रिक्षाचालक" असे म्हटले.
दरम्यान, 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटात वरुण धवन आणि जान्हवी कपूर पुन्हा एकदा मोठ्या पडद्यावर एकत्र पाहायला मिळणार आहेत. याआधी ते 'बवाल' चित्रपटात एकत्र झळकले होते. 'सनी संस्कार की तुलसी कुमारी' या चित्रपटात वरुण धवन 'सनी'च्या भूमिकेत, तर जान्हवी कपूर 'तुलसी कुमारी'च्या भूमिकेत आहे. याशिवाय, सान्या मल्होत्रा, रोहित सराफ, अक्षय ओबेरॉय आणि मनीष पॉल हे कलाकारही यात आहेत. हा चित्रपट २ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.