शिखर पहाडियासोबत लग्न कधी करणार? जान्हवी कपूरने सांगूनच टाकलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 10:05 IST2024-07-26T10:04:52+5:302024-07-26T10:05:19+5:30

जान्हवी आणि शिखर पहाडिया यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

janhavi kapoor talk about her marriage plan with bf shikhar pahariya | शिखर पहाडियासोबत लग्न कधी करणार? जान्हवी कपूरने सांगूनच टाकलं, म्हणाली...

शिखर पहाडियासोबत लग्न कधी करणार? जान्हवी कपूरने सांगूनच टाकलं, म्हणाली...

जान्हवी कपूर ही बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री आहे. श्रीदेवी यांची लेक असलेल्या जान्हवीने आईच्या पावलावर पाऊल ठेवत अभिनयात करिअर करायचं ठरवलं. धडक या सिनेमातून जान्हवीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं होतं. त्यानंतर अनेक सिनेमांमध्ये ती दिसली. सध्या जान्हवी तिच्या बॉलिवूडमधील करिअरमुळे नव्हे तर पर्सनल आयुष्यामुळे चर्चेत आहे. जान्हवी आणि शिखर पहाडिया यांचं रिलेशनशिप जगजाहीर आहे. गेल्या कित्येक वर्षांपासून ते एकमेकांना डेट करत आहेत. आता त्यांच्या लग्नाच्या चर्चा रंगल्या आहेत. 

जान्हवी आणि शिखर अनेक कार्यक्रमांमध्ये एकत्र दिसले आहेत. नुकत्याच पार पडलेल्या अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या विवाहसोहळ्यालाही त्यांनी हजेरी लावली होती. कॉफी विथ करणमध्ये  जान्हवीने तिच्या प्रेमाची जाहीर कबुलीही दिली होती. जान्हवीने नुकतीच पिंकविलाला मुलाखत दिली. या मुलाखतीत तिला लग्न कधी करणार? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर उत्तर देत जान्हवी म्हणाली, "मी सध्या माझ्या आयुष्यात खूप आनंदी आहे. सध्या त्याच्याकडे किंवा माझ्याकडेही वेळ नाही". 


अलिकडेच प्रदर्शित झालेल्या 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात जान्हवी दिसली होती. या सिनेमात तिने अभिनेता राजकुमार रावबरोबर स्क्रीन शेअर केली होती. आता ती 'उलझ' या सिनेमातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. याबरोबरच ज्युनियर एनटीआरसह ती देवरा सिनेमातही मुख्य भूमिकेत दिसणार आहे. 

कोण आहे शिखर पहाडिया? 

शिखर पहाडिया हा महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू आहे. सुशीलकुमार शिंदेंची मोठी मुलगी स्मृती शिंदे आणि संजय पहाडिया यांचा तो मुलगा आहे. खासदार प्रणिती शिंदे यांचा शिखर भाचा आहे. 
 

Web Title: janhavi kapoor talk about her marriage plan with bf shikhar pahariya