​सावत्र बहिणीला सोबत घेऊन मनीष मल्होत्राला भेटायला पोहोचली जान्हवी कपूर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 5, 2018 11:11 IST2018-04-05T05:41:42+5:302018-04-05T11:11:42+5:30

श्रीदेवी हयात असताना जान्हवी कपूर कधीही आपली सावत्र बहिणी अंशुला कपूरसोबत (बोनी कपूर यांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी) दिसली ...

Jahnavi Kapoor, along with her step sister, met Manish Malhotra. | ​सावत्र बहिणीला सोबत घेऊन मनीष मल्होत्राला भेटायला पोहोचली जान्हवी कपूर!

​सावत्र बहिणीला सोबत घेऊन मनीष मल्होत्राला भेटायला पोहोचली जान्हवी कपूर!

रीदेवी हयात असताना जान्हवी कपूर कधीही आपली सावत्र बहिणी अंशुला कपूरसोबत (बोनी कपूर यांची पहिल्या पत्नीपासून झालेली मुलगी) दिसली नाही. पण श्रीदेवींच्या अकाली मृत्यूनंतर जान्हवी व अंशुला कधी नव्हे, इतक्या जवळ आल्या आहेत. श्रीदेवींच्या मृत्यूनंतर अंशुला व अर्जुन कपूर या भावंडांनी सगळे मतभेद विसरून जान्हवी आणि खुशी या दोघींनाही फुलासारखे जपले. त्यांना मानसिक आधार दिला. अंशुला व अजुर्नने दाखवलेल्या या मोठेपणाने बोनी कपूरचं नाही तर जान्हवी व खुशी या दोघीही भारावून गेल्यात. परिणामी गेल्या काही दिवसांत जान्हवी व खुशी यांचा अंशुला व अर्जुनसोबत एक बॉन्ड तयार झाला आहे. त्यामुळे अंशुलाचे नाव घेणेही पसंत न करणारी जान्हवी आज आपल्या सावत्र बहीणीसोबत फिरू लागली आहे.



काल जान्हवी कपूर फॅशन डिझाईनर मनीष मल्होत्रा याला भेटायला त्याच्या घरी पोहोचली. यावेळी जान्हवीसोबत अंशुलाला पाहून अनेकांना आश्चर्य वाटले. यावेळी जान्हवीने पांढºया रंगाचा सलवार कुर्ता घातला होता. तर अंशुला लाल रंगाचा चेकचा शर्ट आणि डेनिममध्ये होती.



दोघीही एकमेकींसोबत अतिशय कम्फर्टेबल होत्या. आता जान्हवी मनीष मल्होत्राला भेटायला का पोहोचली, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण जान्हवी व अंशुला या दोघी सावत्र बहीणींमधील दुरावा पूर्णपणे मिटलायं, हे मात्र आम्ही दाव्यानिशी सांगू शकतोय. दोघींचे फोटो पाहिल्यानंतर कदाचित तुम्हालाही हे पटेल.



ALSO READ : पहिल्यांदाच सावत्र भाऊ अर्जुन कपूरच्या घरी गेल्या जान्हवी आणि खुशी कपूर!

 अर्जुन सध्या त्याच्या आगामी ‘नमस्ते इंग्लंड’ या चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.   श्रीदेवी यांच्या निधनाची बातमी मिळताच तो शूटिंग सोडून लगेच  मुंबईत पोहोचला होता. वास्तविक अर्जुनने नेहमीच जान्हवी आणि खुशीपासून दूर राहणे पसंत केले. तो कधीच त्यांच्या जवळ गेला नाही. परंतु श्रीदेवी यांच्या निधनामुळे सर्व रूसवे दूर करीत त्याने आपल्या दोन्ही बहिणींना सावरले. मध्यंतरी अर्जुन व अंशुला दोघेही बोनी कपूर यांच्या घरी शिफ्ट होणार, अशी बातमी आली होती. जान्हवी व खुशीची काळजी घेता यावी, म्हणून त्याने हा निर्णय घेतल्याचे कळले होते.

Web Title: Jahnavi Kapoor, along with her step sister, met Manish Malhotra.