Jagga Jasoos : ‘जग्गा जासूस’ च्या सेटवर कॅटरिना कैफ का बसलीय चिंताग्रस्त?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2017 13:24 IST2017-01-31T07:51:47+5:302017-01-31T13:24:54+5:30
काय झालं कॅटला? एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पुन्हा काही भांडण झालं का? मग ती का ‘जग्गा जासूस’च्या सेटवर चिंताग्रस्त बसली ...
.jpg)
Jagga Jasoos : ‘जग्गा जासूस’ च्या सेटवर कॅटरिना कैफ का बसलीय चिंताग्रस्त?
क य झालं कॅटला? एक्स-बॉयफ्रेंड रणबीर कपूरसोबत पुन्हा काही भांडण झालं का? मग ती का ‘जग्गा जासूस’च्या सेटवर चिंताग्रस्त बसली आहे? असे तुम्हाला वाटत असेल. खरंतर हा चित्रपटाच्या कथानकाचा भाग आहे. नुकतेच कॅटरिनाने सेटवरील हा तिचा स्टील फोटो सोशल मीडियावर पोस्ट केलाय. रणबीरसोबत ब्रेकअप झाल्यानंतर कॅटरिना सोशल मीडियावर बरीच अॅक्टिव्ह झाली आहे. तिने आत्तापर्यंत अनेक फोटो तिच्या अकाऊंटवरून पोस्ट केले आहेत.
ALSO READ : रणबीर कपूरच्या विरहात कॅटरिना कैफ झाली ‘शायर’!
![]()
ALSO READ : ‘जग्गा जासूस’ पोस्टर : रणबीर कपूर - कॅटरिना कैफ शहामृगावर बसून कुठे चालले?
अनुराग बासु दिग्दर्शित ‘जग्गा जासूस’ चित्रपट बऱ्याच दिवसांपासून चर्चेत आहे. चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी लाँच करण्यात आला असून यात दोघांचीही केमिस्ट्री अत्यंत उत्तमरित्या दाखवण्यात आली आहे. चित्रपटातील अनेक स्टील्स आत्तापर्यंत खास चाहत्यांसाठी शेअर करण्यात आले आहेत. नुकतेच कॅटने शेअर केलेल्या या स्टीलमध्ये ती एका जुन्या कारच्या समोर बसलेली दिसत आहे. सूर्य मावळतीला जात असतानाचा हा फोटो असल्याचे दिसून येत आहे. तिने या फोटोला ‘सूर्य मावळतीला जात असताना तुम्ही कोणतंही काम सोडून त्याच्याकडे पाहत बसले पाहिजे. त्याच्याएवढे दुसरे महत्त्वाचे काम असूच शकत नाही.’ तिने या फोटोत टीशर्ट घातलेला असून डोळयावर चष्मा लावलेला आहे. तसेच तिचा हात फ्रँक्चर झाला असल्याचे दिसतेय.
चित्रपटात रणबीर प्रमुख भूमिकेत असून तो त्याच्या वडिलांचा शोध घेणारा गुप्तहेर साकारतोय. कॅट त्याची हीरोईन आहे. पूर्वाश्रमीचे प्रेमीयुगुल असेलेले रणबीर-कॅट ऐकमेकांच्या प्रेमांत आकंठ बुडालेले असताना या चित्रपटाची शूटींग सुरू झाली होती. नंतर दोघे वेगळे झाल्यामुळे फिल्म लांबणीवर पडली. अखेर पुढील वर्षी ७ एप्रिलला चित्रपट प्रदर्शित होत आहे. प्रीतमने या चित्रपटासाठी तब्बल २४ गाणी तयार केली आहेत.