जॅकलीन का शिकतेय कॉर्चेव्हल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2016 19:19 IST2016-12-31T19:19:04+5:302016-12-31T19:19:04+5:30

ती सध्या कॉर्चेव्हलचे धडे गिरवत असून हे ती का शिकतेय ? अर्थात तिच्या आगामी चित्रपटासाठी. ती कॉर्चेव्हलचे ट्रेनिंग घेत आहे.

Jacqueline's teachable cortex? | जॅकलीन का शिकतेय कॉर्चेव्हल?

जॅकलीन का शिकतेय कॉर्चेव्हल?

रीलंकन ब्युटी जॅकलिन फर्नांडिस ही एक उत्तम अभिनेत्री तर आहेच पण त्यासोबतही ती एक चांगली साहसी पर्यटक आहे. हे आम्ही नाही तर ती स्वत: सोशल मीडियावरून शेअर केलेल्या व्हिडीओ आणि फोटोंवरून सांगू इच्छितेय, असे वाटतेय. ती सध्या कॉर्चेव्हलचे धडे गिरवत असून हे ती का शिकतेय ? अर्थात तिच्या आगामी चित्रपटासाठी. 

जॅकलिन फर्नांडिस ही सिद्धार्थ मल्होत्रासोबत सध्या तिचा आगामी चित्रपट ‘रिलोडेड’ साठी शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी ती विशेष मेहनत घेत असल्याचे कळतेय. तिने इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला असून, त्यात ती स्काय लेसन्स घेत आहे. ‘पहिला दिवस स्काय लेसन्सचा..कुणीही पडले नाही..येस...मी खूप एन्जॉय करतेय’ अशी कॅप्शन तिने या फोटोला दिलीय. या व्हिडीओमध्ये तिच्यासोबत तिचा ट्रेनर देखील आहे. तो तिला या कॉर्चेव्हलचे खास ट्रेनिंग देत आहे. 

‘ढिशूम’ चित्रपटात जॅकलिनने साकारलेला अभिनय आणि अ‍ॅक्शन सीन्स यांच्यामुळे ती मध्यंतरी चर्चेत होती. जॉन अब्राहमसोबतची तिची केमिस्ट्री या चित्रपटाचे खरे वैशिष्ट्य ठरले. सिद्धार्थसोबतची तिची केमिस्ट्री प्रेक्षकांना कितपत आवडते ते आता लवकरच कळेल.


Web Title: Jacqueline's teachable cortex?