​वन्यजीव संरक्षणासाठी सरसावली जॅकलीन!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2016 16:30 IST2016-05-27T11:00:16+5:302016-05-27T16:30:16+5:30

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने वन्यजीव संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. वन्यजीवांच्या अवैध तस्करीविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने सुरु केलेल्या जागतिक ...

Jacqueline for wildlife protection !! | ​वन्यजीव संरक्षणासाठी सरसावली जॅकलीन!!

​वन्यजीव संरक्षणासाठी सरसावली जॅकलीन!!

लिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिस हिने वन्यजीव संरक्षणासाठी पुढाकार घेतला आहे. वन्यजीवांच्या अवैध तस्करीविरोधात संयुक्त राष्ट्र संघाने सुरु केलेल्या जागतिक अभियानास जॅकलीनने पाठींबा दर्शवला आहे. जॅकलीन,ब्राझीलची सुपरमॉडल गीज्ले बंडचेन यांच्यासह अनेकांनी या अभियानास पाठींबा दर्शवला आहे. ‘वाइल्ड फॉर लाइफ’ या अभियानाची सुरुवात अलीकडे नैरोबीमध्ये दुसºया संयुक्त राष्ट्र पर्यावरण सभेत सुरवात झाली.  वन्यजीवांचा अवैध व्यापार संपुष्टात आणण्याच्या या अभियानात लाखो लोकांना सहभागी करून घेणे आणि या दिशेने एकजूट होऊन प्रयत्न करणे, हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. जॅकलीनने वाघ वाचविण्यासाठी या अभियानास पाठींबा दिला आहे. तर बंडचेन ही सागरी कासवांच्या रक्षणासाठी या अभियानात सहभागी झाली आहे. दरवर्षी हजारो वन्यजीवांना अवैधरित्या मारले जाते. या वन्यजीवांच्या संरक्षणासाठी जगभरातील लोकांनी सहकार्य देण्याचे आवाहन संयुक्त राष्ट्र संघाचे महासचिव बान की मून यांनी केले आहे.

Web Title: Jacqueline for wildlife protection !!