उफ़ तेरी अदा, जॅकलिनच्या हॉट पोजेस पाहून शिल्पा झाली फिदा, दिली अशी रिएक्शन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2021 12:46 IST2021-01-15T12:35:40+5:302021-01-15T12:46:05+5:30

जॅकलिन फर्नांडिसची फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची करिनालाही कमाल वाटतेयं.लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखा फिटनेस.

Jacqueline Fernandez, Stunning As A Ballerina Even Shilpa Shetty Surprised To See Her Hot Poses | उफ़ तेरी अदा, जॅकलिनच्या हॉट पोजेस पाहून शिल्पा झाली फिदा, दिली अशी रिएक्शन

उफ़ तेरी अदा, जॅकलिनच्या हॉट पोजेस पाहून शिल्पा झाली फिदा, दिली अशी रिएक्शन

अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसची जादू सिनेमांसोबतच सोशल मीडियावरही कायम आहे. जॅकलिन सोशल मीडियावर खूप सक्रिय असते.इन्स्टाग्रामवर जॅकलिन फर्नांडिजचे 47.4 मिलियन पेक्षा फॉलोअर्स आहेत. सोशल मीडियावर जॅकलिनचे काही फोटो व्हायरल झाले आहेत. तिच्या हॉट फोटोंमुळे जॅकलिन चर्चेत आहे.बॅलेरिना स्टाईलमध्ये शेअर केलेल्या या फोटोत तिनं एका पायाच्या पुढच्या टोकावर शरीराचा तोल सांभाळत दुसरा पाय स्ट्रेच केला आहे. 


यावरून तिचा फिटनेस सहज लक्षात येतो. तिचा हा ग्लॅमरस आणि हॉट अंदाज नेटकऱ्यांना भलताच आवडला आहे. जॅकलिनचे सोशल मीडियावर अनेक फॅनपेज आहेत. ते सतत जॅकलिनचे फोटो शेअर करत असतातमुळात जॅकलिनही फिटनेस फ्रिक अभिनेत्री आहे. जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत.यापूर्वीही तिच्या वर्कआऊट स्टाइलमुळे ती चर्चेत आली होती. 


मात्र यावेळी तिच्या या भन्नाट पोज पाहून चाहत्यांचेच नाही तर सेलिब्रेटींचेही लक्ष वेधून घेतले आहे. जॅकलिनचे फोटो पाहून शिल्पा शेट्टीनेही तिचे कौतुक केले आहे. शिल्पाच नाही तर यामी गौतमीने देखील लाईक्स आणि कमेंट देत कौतुक केले आहे. 

जॅकलिन फर्नांडिसची फिगर,अदा आणि अप्रतिम सौंदर्याची करिनालाही कमाल वाटतेयं.लवकरच आई होणाऱ्या करिना कपूरला हवी आहे जॅकलिन फर्नांडिससारखा फिटनेस. करिना कपूरने इन्स्टाग्राम स्टोरीवर एका जाहिरातीच्या शूटिंग दरम्यानचा फोटो शेअर केला आहे.

त्यात करिना कपूरचा बेबी बम्प स्पष्ट दिसते आहे. करिनाचा हा फोटो शेअर करताना जॅकलिनने लिहिले, 'ओह माय गॉड, इन्सपायरिंग!' यानंतर करिनाने जॅकलिनची पोस्ट शेअर केली आणि लिहिले, 'पण जॅकलिन मला तुझ्यासारखे फिटनेस हवं आहे.'


वर्कफ्रंटबाबत सांगायचं तर जॅकलिन फर्नांडीस आगामी 'भूत पोलीस', 'बच्चन पांडे' आणि 'किक २' सारख्या सिनेमात दिसणार आहे. दरम्यान कोरोना काळत तिचं सलमान खानसोबतचं एक गाणंही रिलीज झालं होतं. तसेच ती बरेच दिवस सलमान खानसोबत त्याच्या पनवेलमधील फार्म हाउसवरच मुक्कामी होती. तेव्हाचेही तिचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.

Web Title: Jacqueline Fernandez, Stunning As A Ballerina Even Shilpa Shetty Surprised To See Her Hot Poses