बॉलिवूडवर आज ही चिमुकली करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2021 13:13 IST2021-04-27T12:27:05+5:302021-04-27T13:13:17+5:30

तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे तिचे अनेक चाहते आहेत.

Jacqueline fernandez shares her childhood photo on instagram | बॉलिवूडवर आज ही चिमुकली करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

बॉलिवूडवर आज ही चिमुकली करतेय राज्य, ओळखा पाहू कोण आहे अभिनेत्री

हल्ली सोशल मीडियावर बरेच सेलिब्रेटी त्यांच्या बालपणीचे फोटो शेअर करत असतात आणि त्यामुळे ते चर्चेत येत असतात. नुकताच अभिनेत्री  जॅकलिन फर्नांडिस हिने तिच्या बालपणीचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. या फोटोत ती तिच्या वडिलांसोबत उभी दिसतेय. पांढऱ्या रंगाच्या ड्रेसमध्ये जॅक खूपच  क्यूट दिसते आहे. जॅकलिन फर्नांडिसने वडिलांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना हा फोटो शेअर केला होता. जॅकलिनच्या या फोटोवर चाहत्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.  

जॅकलिन तिच्या अभिनयापेक्षा तिच्या सौंदर्यासाठी ओळखली जाते. तिच्या ग्लॅमरस अदा, बोल्ड लूक यामुळे भारतामध्ये तिचे अनेक चाहते आहेत. जॅकलिन ही मुळची श्रीलंकेची आहे.तिने आपल्या चित्रपट करिअरची सुरुवात २००९ मध्ये ‘अलादीन’ पासून केली होती. यात तिच्या सोबत रितेश देशमुख आणि अमिताभ बच्चन मुख्य भूमिकेत होते. त्यानंतर ‘मर्डर 2’ मध्ये इमरान हाशमीसोबत दिसली होती. जॅकलिन आज बॉलिवूडवर राज्य करत आहे.

जॅकलिन फर्नांडिस अक्षय कुमारसोबत बच्चन पांडे'मध्ये स्क्रीन शेअर करणार आहे. जॅकलिनकडे सध्या एकूण ४ बिग बजेट चित्रपट आहेत. यापैकी 'बच्चन पांडे' हा एक चित्रपट आहे. रोहित शेट्‌टीच्या 'सर्कस'मध्ये ती रणवीर सिंगसोबत झळकणार आहे.तसेच सैफ अली खान, यामी गौतम आणि अर्जुन कपूरसोबत 'भूत पुलिस', तर सलमान खानसोबत 'किक-२'मध्येही स्क्रीन शेअर करणार आहे. याशिवाय ती अक्षय कुमारसोबत रामसेतू चित्रपटातही काम करताना दिसणार आहे.

Web Title: Jacqueline fernandez shares her childhood photo on instagram