Lockdown मध्ये जॅकलिन फर्नांडिसने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला बेडरुममधला फोटो
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 18:41 IST2020-06-08T18:32:22+5:302020-06-08T18:41:08+5:30
जॅकलिनचा हा फोटो पाहून फॅन्स क्रेझी झालेत.

Lockdown मध्ये जॅकलिन फर्नांडिसने पार केल्या Boldnessच्या सर्व मर्यादा, शेअर केला बेडरुममधला फोटो
''चिट्टीयां कल्लाईयाँ'' वे म्हणत सर्वांना आपल्या तालावर थिरकायला लावणारी अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस हिने बॉलिवूडमध्ये आज तिचे चांगलेच प्रस्थ निर्माण केले आहे. फक्त अभिनयावरच नाही तर तिच्या सौंदर्यावर तिचे चाहते चांगलेच फिदा आहेत. बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस सोशल मीडियावर खूप अॅक्टिव्ह असते. सध्या ती फॅन्ससोबत तिचे एका पेक्षा एक ग्लॅमरस फोटो शेअर करते आहे. जॅकने फॅन्ससोबत सरळ बेडरुममधला फोटो शेअर केला आहे. जॅकलिनचा हा फोटो पाहून फॅन्स क्रेझी झालेत.
जॅकलिनने बेडरुममधला बोल्ड फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. बघता बघता हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जॅक या फोटो खूप सुंदर दिसते आहे. या फोटोत ती बेडवर दिसते आहे. जॅकलिनचा हा कातिलाना अंदाज पाहून फॅन्स घायाळ झाले आहेत.
दबंग सलमान खानसोबत जॅकलिने एक रोमाँटिक नंबरमध्ये दिसली होती. 'तेरे बिना' हे सलमान आणि जॅकलिनचे गाणं फॅन्सना चांगलंच पसंत पडले होते. गाण्याने यूट्यूबवर जबरदस्त रेकॉर्डसुद्धा बनवला होता. ते सध्या त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवर कुटुंबासोबत राहत आहेत.