जॅकलिन फर्नांडिस सोबत काम करायला अक्षय कुमारवर ट्विंकलने घातली बंदी?, अभिनेत्री म्हणाली- मी..

By ऑनलाइन लोकमत | Published: April 27, 2023 04:55 PM2023-04-27T16:55:16+5:302023-04-27T17:00:14+5:30

मनी लाँड्रिंग प्रकरणामुळे चर्चेत असलेल्या जॅकलिनसोबत काम करण्यास ट्विंकल खन्नाने अक्षयवर बंदी घातली अशी अफवा आहे. यावर जॅकलिनने आपली प्रतिक्रिया दिलीय.

Jacqueline fernandez reaction on twinkle khanna not happy about akshay kumar and she working together video viral | जॅकलिन फर्नांडिस सोबत काम करायला अक्षय कुमारवर ट्विंकलने घातली बंदी?, अभिनेत्री म्हणाली- मी..

जॅकलिन फर्नांडिस सोबत काम करायला अक्षय कुमारवर ट्विंकलने घातली बंदी?, अभिनेत्री म्हणाली- मी..

googlenewsNext

जॅकलिन फर्नांडिस अनेकदा चर्चेत असते. मनी लाँड्रिंग प्रकरणात अडकलेल्या महाठग सुरेश चंद्रशेखरने  तिहार जेलमधून अभिनेत्रीला  पत्र लिहून ईस्टरनिमित्त शुभेच्छा दिल्या होत्या.विशेष म्हणजे सुकेश चंद्रशेखरने जॅकलीन फर्नांडिसला तिच्या वाढदिवसानिमित्त एक खास पत्र लिहिलं होतं. त्यामुळे जॅकलिन सतत चर्चेत आहे. 

आता अशी एक अफवा येतेय की अक्षय कुमारची पत्नी ट्विंकल खन्ना हिने अभिनेत्याला जॅकलिनसोबत काम करण्यास नकार दिला होता. मात्र, आता या प्रकरणात जॅकलीनचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये ती ट्विंकल खन्नाच्या  बातमीवर प्रतिक्रिया देताना दिसत आहे.

व्हिडिओमध्ये रिपोर्टर अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला विचारतो की, ट्विंकल तुझ्या आणि अक्षयसोबत काम करण्याबद्दल खूश नसल्याचे अनेक वृत्त आहेत. यादरम्यान अभिनेत्री विचित्र चेहरा करताना दिसत आहे. रिपोर्टरला उत्तर देताना अभिनेत्री म्हणते की मी मूर्ख प्रश्नांची उत्तरे देणार नाही. त्यानंतर ती तिथून निघून जाते. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत. 

     Jacqueline handling controversial question
by      u/Sonam-Ki-Kutiya in      BollyBlindsNGossip    

विशेष म्हणजे जॅकलिन फर्नांडिस आणि अक्षय कुमार 'ब्रदर्स' आणि 'हाऊसफुल 3' सारख्या चित्रपटात दिसले आहेत. त्याचबरोबर ती खिलाडी कुमारसोबत राम सेतू या चित्रपटातही दिसली होती. 'सेल्फी'मध्ये सुद्धा दिवाने या गाण्यातही ती होती. ज्याची चांगली चर्चा रंगली होती.
 

Web Title: Jacqueline fernandez reaction on twinkle khanna not happy about akshay kumar and she working together video viral

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.