"मानसिक त्रास अन् प्रचंड धमक्या..." जॅकलीनने सुकेशविरोधात दिल्ली कमिशनरला लिहिलं पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: February 13, 2024 12:59 PM2024-02-13T12:59:56+5:302024-02-13T13:01:17+5:30

बॉलिवूड अभिनेत्रीच्या अडचणी संपता संपेना!

Jacqueline Fernandez facing threats and harrasment writes letter to Delhi Commisioner complaining sukesh chandrashekhar | "मानसिक त्रास अन् प्रचंड धमक्या..." जॅकलीनने सुकेशविरोधात दिल्ली कमिशनरला लिहिलं पत्र

"मानसिक त्रास अन् प्रचंड धमक्या..." जॅकलीनने सुकेशविरोधात दिल्ली कमिशनरला लिहिलं पत्र

बॉलिवूड अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने (Jacqueline Fernandez) महाठग सुकेश चंद्रशेखरविरोधात (Sukesh Chnadrashekhar) दिल्ली पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. सुकेश तिला धमकी आणि त्रास देत असल्याचा आरोप तिने लावला आहे. सुकेश चंद्रशेखरला काही महिन्यांपूर्वीच 200 कोटींच्या मनी लॉड्रिंगप्रकरणी अटक करण्यात आली होती. तो तुरुंगातूनच जॅकलीनसाठी प्रेमपत्र पाठवत होता. मात्र जॅकलीनचा त्याला काहीच प्रतिसाद नाही हे पाहून त्याने तिचे सर्व चॅट्स, स्क्रीनशॉट्स व्हायरल करण्याची धमकी दिली होती. सध्या सुकेशच्या मनी लाँड्रिंगचं प्रकरण कोर्टात आहे. जॅकलीनही या प्रकरणात अडकली आहे. मात्र आता तिनेच सुकेशविरोधात तक्रार दाखल केली आहे.

जॅकलीनने दिल्ली पोलिस कमिशनर संजय अरोरा यांच्याकडे तक्रार दाखल केली आहे. यामध्ये ती म्हणाली, "मी गेल्या काही दिवसांपासून मानसिक दबाव आणि धमक्यांचा सामना करत आहे. सुकेशच्या धमक्या आणि त्याच्या रणनीतिमुळे मी खूप त्रासली आहे. मी कोर्टात काहीही माहिती देऊ नये म्हणून तो माझ्यावर दबाव टाकेल अशी मला भीती आहे. मी पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या तपासात साक्षीदार आहे."

जॅकलीनने आपल्या अधिकृत मेल आयडीवरुन लिहिले, "मी एक जबाबदार नागरिक आहे. नकळतपणे मी या प्रकरणात अडकले आहे ज्याचा कायद्यावर गंभीर परिणाम होतो. स्पेशल सेलद्वारे दाखल एका प्रकरणात मी प्रॉसिक्युशनकडून साक्षीदार आहे. प्रचंड मानसिक दबाव आणि धमक्या येत असताना मी हे पत्र लिहित आहे."

जॅकलीनने सुरक्षेचीही केली मागणी

या पत्रात जॅकलीनने सुकेश विरोधात आयपीसी कलमांतर्गत एफआयआर दाखल करण्याचीही मागणी केली आहे. यासोबत तिने वर्तमानपत्रातील तीन कात्रणंही जोडले आहेत जे डिसेंबर २०२३ मध्ये प्रसारित झाले होते. 

Web Title: Jacqueline Fernandez facing threats and harrasment writes letter to Delhi Commisioner complaining sukesh chandrashekhar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.