Jacqueline Fernandez: जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 14:47 IST2022-12-12T14:47:06+5:302022-12-12T14:47:56+5:30

ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कोर्टात पोहोचली. मात्र न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली आहे.

Jacqueline-Fernandez-dosent-get-bail-today-gearing-postponed-till-20-dec | Jacqueline Fernandez: जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Jacqueline Fernandez: जॅकलीनला कोर्टाची 'तारीख पे तारीख'; जामीन अर्जावरील सुनावणी पुढे ढकलली

Jacqueline Fernandez: २०० कोटी रुपयांच्या मनी लॉंडरिंगप्रकरणी  आज दिल्ली पटियाला हाऊस कोर्टात आज सुनावणी होती. दरम्यान ईडीच्या चौकशीच्या फेऱ्यात असलेली अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसही कोर्टात पोहोचली. मात्र न्यायालयाने २० डिसेंबरपर्यंत सुनावणी पुढे ढकलली आहे. (200 crore money laundering case)

या प्रकरणी २४ नोव्हेंबरलाच सुनावणी होणार होती. तेव्हा जॅकलीनच्या वकिलांनी युक्तिवादासाठी पुढची तारिख मागितली होती. यानंतर कोर्टाने १२ डिसेंबर तारीख दिली होती.चौकशीवेळी आरोपीला अटक करण्यात आली नव्हती, या आधारावरच जॅकलीनला १५ नोव्हेंबर रोजी जामीन मिळाला होता. 

२०० कोटी रुपयांच्या पैशांच्या गैरव्यवहारप्रकरणी आरोपी सुकेश चंद्रशेखर अटकेत आहे. जॅकलीन त्याची जवळची मैत्रिण होती. सुकेशने तिला अनेक महागडे गिफ्ट्स दिले असल्याची बाब समोर आली. यामुळे जॅकलीनची ईडीकडुन चौकशी सुरु झाली. 

Web Title: Jacqueline-Fernandez-dosent-get-bail-today-gearing-postponed-till-20-dec