सलमान खानच्या 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाण्यावर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस, टीझर रिलीज

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 29, 2021 16:10 IST2021-04-29T16:09:07+5:302021-04-29T16:10:01+5:30

दिल दे दिया गाण्याचा टीझर नुकताच रिलीज करण्यात आला आहे.

Jacqueline Fernandes to release 'Dil De Diya' from Salman Khan's 'Radhe' | सलमान खानच्या 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाण्यावर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस, टीझर रिलीज

सलमान खानच्या 'राधे'मधील 'दिल दे दिया' गाण्यावर थिरकणार जॅकलिन फर्नांडिस, टीझर रिलीज

आपले पहिले गाणे 'सिटी मार'च्या यशानंतर, ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’चे निर्माते आणखी एक डांस नंबर 'दिल दे दिया है' सादर करण्यास सज्ज झाले आहेत. या गाण्याचा टीझर प्रदर्शित करण्यात आला असून या टीझरला प्रेक्षकांची पसंती मिळते आहे.

दिल दे दिया या गाण्यात सलमान खानसोबतजॅकलिन फर्नांडिस थिरकताना दिसते आहे. आतापर्यंत जॅकलिन अनेक डान्स नंबर केले आहेत. मात्र या गाण्यात जॅकलिन एथनिक ड्रेसमधून सगळ्यांचे लक्ष वेधून घेताना दिसते आहे.  त्याचप्रमाणे, जॅकलीनने ज्या डान्स स्टेप केल्या आहेत, त्या समजायला खूपच ट्रिकी आहेत, मात्र त्या तिने अत्यंत सहजतेने केल्या आहेत. हिमेश रेशमियाने या गाण्याला संगीत दिले असून शब्बीर अहमद याचे गीतकार आहेत. हे गाणे, कमाल खान आणि पायल देव यांनी गायले असून शबीना खानने कोरियोग्राफ केले आहे.  

सलमान खानसोबत, या चित्रपटात दिशा पटानी, रणदीप हुड्डा आणि जैकी श्रॉफ यांच्या महत्वपूर्ण भूमिका आहेत. ‘राधे: योर मोस्ट वांटेड भाई’ची निर्मिती सलमान खान फिल्म्सने झी स्टूडियोसोबत मिळून केली आहे. सलमा खान, सोहेल खान आणि रील लाइफ प्रोडक्शन प्राइवेट लिमिटेड द्वारे निर्मित, हा चित्रपट या वर्षी ईदच्या मुहूर्तावर १३ मे रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाला झी ५ वर 'पे-पर-व्यू' सर्विस झी प्लेक्सवर देखील पाहता येईल. झी प्लेक्स डीटीएच प्लेटफॉर्म जसे की डिश, डी2एच, टाटा स्काय आणि एयरटेल डिजिटल टीवी वर देखील उपलब्ध असेल. 
 

Web Title: Jacqueline Fernandes to release 'Dil De Diya' from Salman Khan's 'Radhe'