​जॅकी श्रॉफच्या पत्नीचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर.... या अभिनेत्याने पुरावा म्हणून दोघांचे खाजगी फोटो कोर्टात केले होते सादर

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2017 09:01 AM2017-11-07T09:01:56+5:302017-11-07T14:31:56+5:30

जॅकी श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याचे आणि आयशा श्रॉफचे अफेअर होते. आयशाला त्याने एका बसस्टॉपला पाहिले होते. तिला पाहाताच ...

Jackie Shroff's wife had an affair with the actress .... The actor had both the private photos of the evidence as evidence. | ​जॅकी श्रॉफच्या पत्नीचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर.... या अभिनेत्याने पुरावा म्हणून दोघांचे खाजगी फोटो कोर्टात केले होते सादर

​जॅकी श्रॉफच्या पत्नीचे या अभिनेत्यासोबत होते अफेअर.... या अभिनेत्याने पुरावा म्हणून दोघांचे खाजगी फोटो कोर्टात केले होते सादर

googlenewsNext
की श्रॉफ फिल्म इंडस्ट्रीत येण्यापूर्वी त्याचे आणि आयशा श्रॉफचे अफेअर होते. आयशाला त्याने एका बसस्टॉपला पाहिले होते. तिला पाहाताच क्षणी तो तिच्या प्रेमात पडला होता. जॅकीने अभिनय क्षेत्रात येण्यापूर्वी आयशा ही प्रसिद्ध मॉडेल होती. जॅकीने स्वामी दादा या त्याच्या चित्रपटापासून त्याच्या कारकिर्दीला सुरुवात केली. काहीच वर्षांत जॅकी प्रसिद्ध अभिनेता बनला. आयशा आणि जॅकीने १९८७ ला लग्न केले. त्या दोघांना टायगर आणि कृष्णा अशी दोन मुले आहेत. जॅकीने अभिनय करण्यासोबतच स्वतःचे एक प्रोडक्शन हाऊस देखील सुरू केले होते. या प्रोडक्शन हाऊसचे काम आयशा देखील सांभाळत होती. त्यानंतर २००९ मध्ये आयशाने अभिनेता साहिल खानसोबत स्वतःचे प्रोडक्शन हाऊस सुरू केले. साहिल हा एक मॉडेल असून त्याने स्टाईल या चित्रपटात मुख्य भूमिका साकारली होती. साहिल आणि आयशा बिझिनेस पार्टनर असल्याने ते सतत पार्टींमध्ये, समारंभात एकत्र दिसत होते. पण ते बिझिनेस पार्टनर असल्याने आणि त्यातही त्यांच्यात अनेक वर्षांचे अंतर असल्याने या गोष्टीची मीडियात तितकीशी चर्चा झाली नव्हती. पण नंतरच्या काळात ते अनेक वेळा नाइट क्लबमध्ये देखील एकमेकांसोबत वेळ घालवत असल्याचे दिसून आले. साहिल आणि आयशा मध्ये मैत्री पेक्षा जास्त काही तरी असल्याची चर्चा चांगलीच रंगली होती. या सगळ्याची चर्चा सुरू असतानाच आयशा श्रॉफने साहिलवर एक केस दाखल केली. या केसमध्ये प्रोडक्शन हाऊसमध्ये आयशाने टाकलेल्या पैशांचा साहिलने गैरवापर केला असल्याचे तिने म्हटले होते. पण या केसची चौकशी सुरू असताना या प्रोडक्शन हाऊससोबतच साहिल आणि आयशाचे एक सायबर सिक्युरीटी फर्म असल्याचे सगळ्यांच्या लक्षात आले. तसेच ते अनेक ठकाणी हॉलिडेला गेले असल्याचेही त्यातून कळून आले होते. एवढेच नव्हे तर ही केस कोर्टात उभी राहिल्यानंतर साहिलने आयशा आणि त्याचे काही खाजगी फोटो कोर्टात सादर केले होते. त्यामुळे साहिल आणि आयशा यांच्यात अफेअर असल्याचे त्याने कोर्टात सिद्ध केले होते. हे प्रकरण चांगलेच गाजत असताना आयशाने साहिल आणि तिच्यात असलेला पैशांचा वाद मिटवला आणि हे प्रकरण तिथेच थांबवले. 

sahil khan ayesha shroff

Also Read : 'त्या' रात्री जॅकी श्रॉफने केला होता तब्बूवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न ?

Web Title: Jackie Shroff's wife had an affair with the actress .... The actor had both the private photos of the evidence as evidence.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.