Jab Harry Met Sejal Mini Trail 5 : वेंधळ्या अनुष्का शर्माने हरवली अंगठी! शाहरूख खान घेतोय शोध!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2017 11:12 IST2017-07-03T05:42:04+5:302017-07-03T11:12:04+5:30
‘जब हॅरी मेट सेजल’चा पाचवा मिनी ट्रेलर आज रिलीज झाला. शाहरूख खान व अनुष्का शर्मा स्टारर ‘जब हॅरी मेट सेजल’च्या या ट्रेलरमध्ये अनुष्काचा वेंधळा स्वभाव दिसून येतो. वेंधळी अनुष्का आणि तितकाच हजरतजबाबी शाहरूख, असे मस्त कॉम्बिनेशन यात दिसते.

Jab Harry Met Sejal Mini Trail 5 : वेंधळ्या अनुष्का शर्माने हरवली अंगठी! शाहरूख खान घेतोय शोध!!
‘ ब हॅरी मेट सेजल’चा पाचवा मिनी ट्रेलर आज रिलीज झाला. शाहरूख खान व अनुष्का शर्मा स्टारर ‘जब हॅरी मेट सेजल’च्या या ट्रेलरमध्ये अनुष्काचा वेंधळा स्वभाव दिसून येतो. वेंधळी अनुष्का आणि तितकाच हजरतजबाबी शाहरूख, असे मस्त कॉम्बिनेशन यात दिसते. अनुष्काला तिच्या होणा-या नव-याने दिलेली अंगठी हरवते आणि मग काय, अंगठी शोधण्यासाठी ती शाहरुखला भाग पाडते. तिच्या या वेंधळेपणाला शाहरुख जाम वैतागतो, असे या ट्रेलरमध्ये दिसते.
या सिनेमाचे एकूण सात मिनी ट्रेलर असून त्यातले पाच ट्रेलर प्रदर्शित करण्यात आले आहेत. यातल्याच दुसºया मिनी ट्रेलरने वाद ओढवून घेतल्याचे तुम्हाला ठाऊक आहेच. या ट्रेलरमधील ‘इंटरकोर्स’ शब्दाच्या वापरावर सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष पहलाज निहलानी यांनी आक्षेप नोंदवला होता. सोबतच या शब्दाला पास करण्यासाठी एक लाख लोकांचे वोट जमा करण्याचे आदेशही मेकर्सला दिले होते. एक अनुष्का शर्मा या सिनेमात एका गुजराती मुलीची सेजलची भूमिका निभावतेय. ही सेजल युरोप फिरायला जाते आणित तिथे तिला हॅरी म्हणजेच शाहरुख भेटतो. येत्या ४ आॅगस्टला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.
‘जब हॅरी मेट सेजल’च्या निमित्ताने प्रथमच शाहरूख खान, अनुष्का शर्मा व इम्तियाज अली एकत्र आले आहेत. शाहरूखला या वर्षांत एका हिटची गरज आहे. त्यामुळे शाहरूखला या चित्रपटाकडून ब-याच अपेक्षा आहेत. आता त्याच्या या अपेक्षा किती पूर्ण होतात, ते आपण लवकरच बघणार आहोत. तोपर्यंत चित्रपटाचा हा पाचवा मिनी ट्रेलर तुम्ही बघायला हवा. बघा तर !!