आॅल इज वेल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2016 17:36 IST2016-12-06T17:27:54+5:302016-12-06T17:36:49+5:30

सतीश डोंगरे चित्रपट, वेबसिरीज, विदेशात शुटिंग, एका पाठोपाठ येणाºया आॅफर्स अशा आनंदी वातावरणात सध्या मी जगत आहे. नामांकित दिग्दर्शक, ...

It's well | आॅल इज वेल

आॅल इज वेल

ong>सतीश डोंगरे

चित्रपट, वेबसिरीज, विदेशात शुटिंग, एका पाठोपाठ येणाºया आॅफर्स अशा आनंदी वातावरणात सध्या मी जगत आहे. नामांकित दिग्दर्शक, परिपक्व अभिनेते अशा व्यक्तींबरोबर काम करण्याची प्रत्येक अभिनेत्रीची इच्छा असते. आज माझी ही इच्छा पूर्ण होत आहे. एवढेच काय तर आपणही विदेशात शुटिंगला जावे हे स्वप्नही साकार झाल्याने मी खूपच उत्साहित असून, सध्या आयुष्यात ‘वॉल इज वेल’ आहे, अशी उत्साही प्रतिक्रिया श्वेता त्रिपाठी या अभिनेत्रीने दिली. सीएनएक्सशी मनमोकळा संंवाद साधताना तिने व्यक्तिगत आयुष्याशी निगडित अनेक किस्से सांगितले. 

प्रश्न : संपूर्ण चित्रपटाची शुटिंग मोबाइलच्या साहाय्याने करण्याचा पहिला-वहिला प्रयोग केला गेला. त्यात तुझी महत्त्वाची भूमिका आहे, कसा अनुभव सांगशील?
- शुटिंग म्हटली की, सेटवर कलाकारांपासून स्पॉट बॉयपर्यंतच्या लोकांची वर्दळ असते. तसेच चार ते पाच कॅमेरे तुमच्या चहुबाजूने फिरत असतात, असा माझा आजपर्यंतचा अनुभव होता. परंतु दिग्दर्शक अनुराग कश्यप यांच्या ‘जू’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान मला वेगळ्याच अनुभवाला सामोरे जावे लागले. कारण या चित्रपटाची संपूर्ण शूटिंग मोबाइलच्या साहाय्याने केली गेली. बहुधा देशात असा प्रथमच प्रयोग केला गेला असावा. शूटिंगदरम्यान सेटवर सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लोकांची अजिबात वर्दळ नव्हती. सेटवर एकच मोबाइल कॅमेराधारक, कलाकार अन् दिग्दर्शक असल्याने आम्हाला खूपच मोकळीक मिळाली. ‘दडपण’ हा शब्दच मी विसरून गेली होती. त्यातच सतत प्रोत्साहित करण्याचा स्वभाव असलेल्या अनुराग कश्यप यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव काही औरच होता. या चित्रपटात माझी भूमिका एका नशेच्या आहारी गेलेल्या तरुणीची आहे.  



प्रश्न : तू वेबसिरीजमध्येही काम करीत आहेस, यात तू एका ‘बेफिक्रे’ तरुणीच्या भूमिकेत आहेस, काय सांगशील?
- ‘द ट्रिप’ या वेबसिरीजमध्ये अभिनेत्री लीजा हेडन हिच्यासोबत मी काम करीत आहे. मी वधूच्या भूमिकेत असून, हा एक कॉमेडी ड्रामा आहे. यामध्ये दिल्लीच्या चार मैत्रिणींची कथा दाखविण्यात आली आहे. ज्या लग्नाअगोदर दिल्ली येथून मौजमस्ती करण्यासाठी बॅँकॉकला जात असतात. लक्ष राज आनंद यांनी दिग्दर्शित केलेल्या या वेबसिरीजचा प्रीमियर लवकरच रिलीज केला जाणार आहे.  ही कॉमेडी वेबसिरीज असल्याने मला मौज-मस्ती करण्याची भरपूर संधी मिळाली आहे. शूटिंगदरम्यानचे अनेक किस्से असे आहेत की, जे आठवल्यास हसायला येते. 



प्रश्न : वेबसिरीजनिमित्त तुझी विदेशात शूटिंग करण्याची इच्छा पूर्ण झाली?
- होय, माझे पहिल्यापासूनच स्वप्न होते की, शूटिंगनिमित्त मला विदेशात जाण्याची संधी मिळावी. वेबसिरीजच्या निमित्ताने ते पूर्ण झाले. प्रवास आणि अभिनय या दोन्ही गोष्टी मला प्रचंड आवडत असल्याने हा शूटिंगदरम्यानचा प्रवास माझ्यासाठी अविस्मरणीय होता. दिल्ली येथून सुरू झालेली शूटिंग, शिलॉँग अन् थायलॅँड येथील ‘कोह समुई’ बेटावर पोहचली. हा संपूर्ण प्रवास एवढा मजेशीर होता की, यातील सर्व आठवणी मी मनात कैद केल्या आहेत. 

प्रश्न : नवाजुद्दीन सिद्दीकी यांच्याकडे चरित्र अभिनेता म्हणून बघितले जाते. त्यांच्यासोबत काम करताना तू कम्फर्ट होती का?
- खरं तर नवाजुद्दीन सिद्दीकी हे एक दमदार अभिनेते आहेत. चरित्र अभिनेता म्हणून जरी त्यांच्याकडे बघितले जात असले तरी ते सर्वच फॉरमॅटमध्ये भारदस्त आहेत. त्यांच्यासोबत काम करणे खरं तर भाग्यच म्हणायला हवे. मला त्यांची सर्वात भावणारी बाब म्हणजे त्यांच्यात कुठल्याच प्रकारचा अहमभाव नाही. ‘हरामखोर’ या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांनी कधीच मला ज्युनिअर अ‍ॅक्टर म्हणून बघितले नाही. अभिनयातील बारकावे ते अतिशय मनमोकळ्यापणाने समजावून सांगत असत. मीच नव्हे तर इतरही कलाकारांसोबत ते अतिशय मनमोकळेपणे वागतात.    



प्रश्न : तुझ्या करिअरच्या या सुवर्णकाळाचे श्रेय तू कोणाला देऊ इच्छिते?
- इंडस्ट्रीमध्ये यायचे असेल तर गॉडफादर असायला हवा. परंतु मला कोणीच गॉडफादर नाही. एक मात्र नक्की की, जर तुम्हाला इंडस्ट्रीमध्ये करिअर करायचे असेल तर तुमच्यात गुणवत्ता असायला हवी. याचा अर्थ मी फार काही मिळवले असे नाही तर, सध्या ज्या स्थानावर मी आहे त्यात नक्कीच समाधानी आहे. खरं तर ‘मसान’मधून मला स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मिळाली. हाच प्लॅटफॉर्म आज माझ्यासाठी लकी ठरत आहे. आगामी काळात यातील सातत्य टिकवणे हे माझ्यासाठी आव्हान असेल हे नक्की. 

Web Title: It's well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.