It's SHOCKING : गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून होणार ‘दमदमी माता’ दिशा पटानीची पूजा...!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2017 13:21 IST2017-02-14T07:51:02+5:302017-02-14T13:21:02+5:30
दिल्ली युनिव्हर्सिटीच्या हिंदू कॉलेजचे विद्यार्थी दरवर्षी व्हॅलेन्टाईन डेच्या दिवशी एका झाडाची पूजा करतात, हे तर तुम्हाला ठाऊक असेलच? या ...

It's SHOCKING : गर्लफ्रेन्ड मिळावी म्हणून होणार ‘दमदमी माता’ दिशा पटानीची पूजा...!
या वर्षी ‘दमदमी माता’साठी दिशाला सर्वाधिक मते मिळालीत आणि तिची निवड झाली. यापूर्वी उर्वशी रौतेला, सनी लिओनी, दीपिका पादुकोण अशा अनेक अभिनेत्रींची ‘दमदमी माता’ म्हणून निवड झाली आहे. हिंदू कॉलेजातील हे झाड ‘लव्हर्स पॉर्इंट’ म्हणून ओळखले जाते. या झाडाला ‘वर्जिन ट्री’ सुद्धा म्हटले जाते. फ्रेशर्स पंडित बनून ही पूजा करतात. या पूजेसाठी एक खास आरतीही रचली गेली आहे. ‘जय दमदमी माता, मैया जय दमदमी माता, तुमको दिनभर देखूं, रातभर सो नहीं पाता, मैया, जय दमदमी माता...’अशी ही आरती आहे.
या ‘वर्जिन ट्री’ला हार्ट शेप फुग्यांनी सजवले जाते. यानंतर यावर ‘दमदमी माते’चा फोटो लावला जातो. या ‘दमदमी माते’ची पूजा केल्याने सहा आठवड्याच्या आत ‘गर्लफ्रेन्ड’ मिळते. शिवाय पूजा करणारी व्यक्ति वर्जिन असेल तर वर्षभरात त्याची वर्जिनिटी भंग पावते, अशी एक विचित्र मान्यता या कॉलेजमध्ये आहे.
२०१५ मध्ये लिसा हेडन हिला ‘दमदमी माता’ बनवण्यात आले होते. २०१४ मध्ये दीपिका पादुकोण ही ‘दमदमी माता’ बनली होती. तेव्हा बघा, ‘वर्जिन ट्री’चे काही फोटो आणि वाचा ‘दमदमी माते’ची आरती.