It's Shocking : कॅटरिना कैफनंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेली ही नवी मुलगी कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2017 16:49 IST2017-07-07T11:11:51+5:302017-07-07T16:49:51+5:30

बॉलिवूडमध्ये चॉकलेट बॉयची इमेज असणारा रणबीर कपूरला त्याची नवी गर्लफ्रेंड मिळाल्याची चर्चा आहे. एक वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार रणबीरला ...

It's Shocking: After the Katrina Kaif, who is the new girl born in Ranbir Kapoor's life? | It's Shocking : कॅटरिना कैफनंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेली ही नवी मुलगी कोण ?

It's Shocking : कॅटरिना कैफनंतर रणबीर कपूरच्या आयुष्यात आलेली ही नवी मुलगी कोण ?

लिवूडमध्ये चॉकलेट बॉयची इमेज असणारा रणबीर कपूरला त्याची नवी गर्लफ्रेंड मिळाल्याची चर्चा आहे. एक वृत्त पत्राने दिलेल्या माहितीनुसार रणबीरला त्याचे नवं प्रेम मिळाल्याची चर्चा आहे. या मुलीचं नाव मात्र काही अजून कळू शकलेलं नाही.  सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार इतकेच समजू शकले आहे की रणबीर ज्या मुलीला सध्या डेट करतो आहे ती मुंबईतलीच राहणारी आहे. रणबीरने आपल्या एक्सगर्ल फ्रेंडबरोबर म्हणजेच अर्थात कॅटरिना कैफसोबत त्याच्या नव्या गर्लफ्रेंडची भेट घालून दिली आहे. पण कॅटरिनाला रणबीरच्या नव्या गर्लफ्रेंडला भेटून फारसा आनंद झाला नाही आहे. रणबीर आपल्या नव्या प्रेमासोबत आपला बऱ्यास वेळा घालवत आहे. रणबीर तिच्याशी तासंतास मोबाईलवर ही बोलत असतो.
 
also read  : ​कॅटरिना कैफ म्हणाली, रणबीर कपूरसोबत पुन्हा काम शक्य नाही! 

सूत्रांकडून असे ही कळतंय की रणबीरचे असे कोणतेही अफेअर नाही तो हे सगळं फक्त कॅटरिनाला दाखवण्यासाठी करतोय. कतरिनाही तिला या सगळ्यांमुळे आपल्याला काहीच फरक पडत नसल्याचे दाखवते आहे. पण तिच्या चेहऱ्यावरचे तिचे हावभाव तिच्या मनातलं फ्रस्ट्रेशन सांगून जात आहेत.  रणबीर आणि कॅटरिनचे ब्रेकअप 2016मध्ये झाले. यानंतर त्यांनी जग्ग जासूस या चित्रपटाचे शूटिंग केले. सध्या ते चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एकत्र फिरत आहेत. ब्रेकअपनंतरची कॅटरिना आणि रणबीरची केमिस्ट्री बघण्यासाठी त्यांचे फॅन्स नक्कीच उत्सुक असतील. चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे याला रणबीर कपूरने प्रोड्यूस केले आहे. हा एक म्युझिकल चित्रपट असून यात तब्बल 28 गाण्यांचा समावेश आहे. 'जग्गा जासूस'चे दिग्दर्शन अनुराग बासूने केले आहे. 14 जुलैला हा चित्रपट रिलीज होणार आहे. 

Web Title: It's Shocking: After the Katrina Kaif, who is the new girl born in Ranbir Kapoor's life?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.