​भावाचा सल्ला डावलून पुन्हा जान्हवी कपूरसोबत दिसला इशान खट्टर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2017 11:21 IST2017-05-30T05:51:06+5:302017-05-30T11:21:06+5:30

शाहिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर कदाचित सध्या कुणाचेच ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. होय, करिअरच्या अगदी पहिल्या टप्प्यावर लिंक-अपमध्ये फसू ...

Ishaan Khattar appeared with Jannahvi Kapoor again after the brother's advice | ​भावाचा सल्ला डावलून पुन्हा जान्हवी कपूरसोबत दिसला इशान खट्टर!

​भावाचा सल्ला डावलून पुन्हा जान्हवी कपूरसोबत दिसला इशान खट्टर!

हिद कपूरचा लहान भाऊ इशान खट्टर कदाचित सध्या कुणाचेच ऐकण्याच्या मूडमध्ये नाही. होय, करिअरच्या अगदी पहिल्या टप्प्यावर लिंक-अपमध्ये फसू नकोस, असा सबुरीचा सल्ला शाहिदने इशानला दिला होता. पण इशान आपल्या मोठ्या भावाचा हा सल्ला मानण्याच्या मन:स्थितीत नाहीच मुळी. होय, शाहिदचा सल्ला डावलून काल संध्याकाळी इशान आणि श्रीदेवीची लाडकी लेक जान्हवी कपूर हे दोघे एकत्र दिसले.
काल संध्याकाळी प्रियांका चोप्राचा पहिला हॉलिवूडपट ‘बेवॉच’चे स्पेशल स्क्रिनिंग ठेवण्यात आले होते. या स्क्रिनिंगला इशान व जान्हवी दोघेही पोहोचले. तेही एकाच कारमधून. या दोघांसोबत काही मित्रही होते. जान्हवी नेहमीप्रमाणे सुंदर दिसत होती तर ड्रायव्हिंग सीटवर बसलेला इशानही हँडसम दिसत होता.





ALSO READ : जान्हवी कपूर दिसली इशान खट्टरसोबत

खरे तर शाहिदने इशानला जान्हवीबद्दल वॉर्न केले आहे. जान्हवीसोबतच्या तुझ्या अफेअर्सच्या बातम्या मीडियात येत आहेत. करिअरवर लक्ष देण्याच्या या काळात अशा बातम्यांपासून दूर राहा, असा सल्ला शाहिदने त्याला दिला होता. मीडियात अशा कारणांसाठी चर्चेत येण्यापेक्षा आपल्या कामावर लक्ष केंद्रीत कर, असेही शाहिदने त्याला बजावले होते. पण ऐकेल तो इशान कसला. काल-परवाच भावाने सल्ला दिला अन् लगेच इशान जान्हवीसोबत दिाला. सध्या इशान माजिद मजीदी यांच्या ‘बियॉन्ड दी क्लाऊड्स’ या चित्रपटात काम करतो आहे.





करण जोहर लवकरच इशान खट्टर, जान्हवी कपूर आणि सारा अली खान यांना आपल्या चित्रपटात लॉन्च करणार असल्याची खबर आहे. अर्थात अद्याप याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. केवळ करण जोहरने आपल्या बर्थ डे पार्टीत तसे जाहिर केले होते. 

Web Title: Ishaan Khattar appeared with Jannahvi Kapoor again after the brother's advice